पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीची प्रकृती बिघडल्यामुळे तिनं करोना चाचणी करून घेतली. २० जुलै रोजी ती ग्रेटर येथील रुग्णालयात गेली. तिथं अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आलं. सोमवारी सकाळी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्याचवेळी वॉर्डातील डॉक्टर तिला करोनापासून बचावासाठी करावयाचे उपाय सांगत होते. तेव्हा डॉक्टरनं छेडछाड केली, असा आरोप तरुणीनं केला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तरुणी घरी गेली. तिनं घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिनं एक्स्प्रेस वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, छेडछाडीचा आरोप झालेला डॉक्टर हा त्याच हॉस्पिटलमध्ये पार्टटाइम काम करतो. क्रिटिकल केअर या पदावर आहे. तो स्वतःही कोविड रुग्ण आहे.
पोलीस अधिकारी योगेश मलिक यांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीनंतर दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.