बंगळुरू: डेन्टिस्ट तरुणीनं तिच्या सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीव दिला. तरुणी मूळची लखनऊची होती. बंगळुरूतील एम. एस. रमय्या हॉस्पिटलमध्ये ती कार्यरत होती. याच रुग्णालयात काम करणारा एक सहकारी तिला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिनं जीवन प्रवास थांबवला.

पीडितेच्या रुग्णालयात काम करणारा सुमित नावाचा तरुण सतत त्रास देत होता. सुमितनं तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. तिनं मद्यपान, धूम्रपान करावं यासाठीही सुमित आग्रह धरू लागला. त्यासाठी तो पीडितेवर दबाव टाकत होता. तरुणीनं त्याच्या मागण्या अनेकदा फेटाळून लावल्या. सुमितनं पीडितेकडे पैशांची मागणी केली. तरुणीनं पैसे देण्यास नकार दिला.
कार पळवली; कुटुंबाला संपवण्यासाठी कड्यावरून पाडली; भारतीयाच्या कारनाम्यानं अमेरिका सुन्न
तरुणीकडून पैसे मिळत नसल्यानं, लग्नाचा प्रस्ताव फेटाळत आल्यानं सुमित संतापला. त्यानं तरुणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तिच्या चारित्र्याबद्दलच्या खोट्या गोष्टी रुग्णालयात पसरवल्या. त्यामुळे पीडिता कोलमडली. तिनं आत्महत्या केली. २५ जानेवारीला तिनं आयुष्याला पूर्णविराम दिला. संजय नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here