वसई: पत्नीने एक लाखांची सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नायगाव परिसरात पोलिसांना आढळलेल्या एका अज्ञात मृतदेहाच्या प्रकरणाचा तपास करताना हा प्रकार समोर आला आहे. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असे मृत पतीचे नाव असून या हत्या प्रकरणात पोलिसांनी मृतकाच्या पत्नीसह दोन आरोपींना अटक केली आहे.

वालीव पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथील रिक्षा स्टॅन्ड ब्रिजखाली २७ जानेवारीला एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचे व तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी या प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास केला. मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ता तक्रारींचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली व मृतकाचे गोरेगाव येथील राहते घर गाठले. परिसरात चौकशी केली असता, मृत कमरुद्दीनच्या शेजारी राहणारे दाम्पत्य गुन्हा घडल्यापासून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुजरात राज्यातील वापी परिसरातून पोलिसांनी या दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
सिगारेट, दारु, पैसे, लग्न…; मागण्या वाढतच गेल्या; जबरदस्तीला कंटाळून डेन्टिस्टनं जीव दिला
गोरेगाव पूर्व परिसरातील भगतसिंग चाळीत परिसरात राहणाऱ्या मृतकाची पत्नी अशिया अन्सारी हिने तिच्या शेजारी राहणारे दाम्पत्य बिलाल पठाण व सौफिया पठाण यांना आपला पती कमरुद्दीनला ठार मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर वसई जवळील नायगाव परिसरात नेऊन त्याची या दोघांनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केली व मृतदेह झुडूपात फेकून दिला.
वाचवा वाचवा! मॅनेजरचा मदतीसाठी टाहो, १५ मिनिटं आक्रोश करत राहिला; मर्सिडीज कारनं जीव घेतला
कमरुद्दीनची पत्नी अशिया हिनेच तो बेपत्ता असल्याची तक्रारदेखील बांगूरनगर पोलीस ठाण्यात दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक महिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पत्नी आशिया अन्सारी व शेजारी राहणारे दाम्पत्य बिलाल पठाण व सौफिया पठाण अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here