मुंबई- पतौडी घराण्याची राजकन्या सारा अली खान आपल्यात आणि क्रिकेटपटू शुभमन गिलमध्ये काहीही नाही असे अनेकदा म्हणाली असली तरी व्हायरल होणारे फोटो काहीतरी वेगळेच सांगतात. असे म्हणतात की प्रेम आणि हसू लपवता येत नाही. सैफ अली खानची मुलगी साराच्या बाबतीतही असेच घडत आहे. सारा आणि शुभमन गिल यांच्या लिंकअपच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. सारा आणि शुभमन गिलचा एक फोटो समोर आला आहे, हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा फोटो एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये सारा क्रिकेटर शुभमन गिलसोबत गप्पा मारत वेळ घालवताना दिसत आहे. हा फोटो अहमदाबाद विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. सारा अली खान आणि शुभमन गिल या दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांवर आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या फोटोमुळे त्यांच्या अफेअरला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. मात्र हा फोटो जुना आहे की आताचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सारा अली खान- शुभमन गिल

सारा आणि शुभमनमध्ये काय चाललंय?

सारा अली खान आणि शुभमन गिल हा लपाछपीचा खेळ का खेळत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सारा आणि शुभमन गिल अनेकदा एकत्र फिरताना दिसले आहेत. ते दोघे पहिल्यांदा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी बाहेर जाताना दिसले होते तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

सारा अली खान- शुभमन गिल

‘आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनींसारखी असावी’

सारा आणि शुभमन गिल यांच्यात काहीतरी सुरू असल्याची झलक विराट कोहलीच्या व्हिडिओवरून समोर आली आहे. हा व्हिडिओ एका सामन्यादरम्यानचा आहे, व्हिडिओत स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले पाहायला मिळाले. विराट कोहली समोर मैदानात आहे. अचानक प्रेक्षकांमधून शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या नावाच्या घोषणा व्हिडिओत ऐकू येऊ लागल्या. त्यामध्ये आमची वहिनी कशी असावी, सारा वहिनींसारखी असावी.’ अशा घोषणा प्रेक्षक देऊ लागताच विराट कोहलीने प्रेक्षकांना जोरात बोलण्याचे संकेत दिले. विराट कोहलीचा हा व्हिडिओ अजूनही चर्चेत आहे.


साराला डेट करण्याच्या बातमीवर शुभमनची प्रतिक्रिया

पंजाबी चॅट शो ‘दिल दियां गल्लान’मध्ये जेव्हा अभिनेत्री सोनम बाजवाने शुभमन गिल याला साराला डेट करण्याबद्दल विचारले, तेव्हा त्याने सांगितले की कदाचित मी तिला डेट करत आहे. जेव्हा सोनम म्हणाली की साराबद्दल संपूर्ण सत्य सांगा, तेव्हा शुभमन चुटकीसरशी– साराचे सर्व सत्य सांगितले आहे असे म्हटले. शुभमन गिल हा आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. शुभमन याने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात शतक झळकावले तेव्हा सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला होता. तेव्हापासून तो देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

वनिता-सुमितला हळद लागली, हास्यजत्रेच्या टीमसह दोघांनी केली धम्माल मस्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here