आशियातील सकारात्मक संकेतांनी आज मंगळवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०० अंकांनी उसळला होता. त्यानंतर त्यात काही अंशी नफावसुली झाली. मात्र निर्देशांकाने पुन्हा आपली घोडदौड कायम ठेवली. उत्तरोत्तर तेजी वाढत गेली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५४८.५७ अंकांच्या वाढीसह ३८४८३ अंकांवर बंद झाला. निफ्टी १६५ अंकांच्या तेजीसह ११२९६.८० अंकांवर स्थिरावला.
जगभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच अमेरिका आणि भारतात करोनाचा मोठा प्रभाव आहे. करोनावर लस संशोधन अंतिम टप्प्यात आहे. विविध देशांत लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असल्यानं त्याबाबत आशेचा किरण निर्मण झाला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सिनेटने अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी आर्थिक पॅकेज देण्यास अनुकूलता दर्शवली असल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे शेअर दलालांनी सांगितले.
सोमवारी अमेरिकन शेअर बाजार तेजीसह बंद झाले होते. त्यापाठोपाठ आज आशियातील जपान, सिंगापूर, हॉंगकॉंग, चीन येथील प्रमुख भांडवली बाजारांमध्ये तेजी दिसून आली. सिंगापूर एक्सचेंजचा निफ्टी ७६ अंकांनी वधरला होता. तर हाँगकाँगचा हँगसेंग ३३९ अंकांनी वाढला. जागतिक बाजारात आज खनिज तेलाच्या किमतीत ३५ सेंट्सची वाढ झाली. खनिज तेलाचा भाव ४३.७६ डॉलर प्रती बॅरल झाला.
आज नेस्ले, आयडीबीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट अशा महत्वाच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. त्याशिवाय महिंद्रा फायनान्सचा राईट ईश्यु आज खुला होणार आहे. याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात ९७८ कोटींचे शेअर विक्री केले.
सध्या बाजारात बिर्ला कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, जे.के लक्ष्मी सिमेंट, एसीसी यासारख्या सिमेंट कंपन्याच्या शेअरमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता क्षेत्रात देखील खरेदीचा ओघ दिसून आला. प्रेस्टिज इस्टेट, डीएलएफ, शोभा या कंपन्यांचे शेअर वधारले. टाटा मोटर्स, एसबीआय, महिंद्रा फायनान्शिअल, रिलायन्स इंडस्ट्रीज, फ्युचर रिटेल, टाटा कम्युनिकेशन, एमसीएक्स, एनटीपीसी, सन फार्मा, नेस्ले, ओएनजीसी आदी शेअर तेजीत आहेत.
बँकिंग क्षेत्रात मात्र विक्रीचा दबाव दिसून आला. करोनाकाळात बँकिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. बँकांना बुडीत कर्जाची चिंता सतावत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज बँकिंग शेअर्सची विक्री करून आपली गुंतवणूक काढून घेतली. येस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, युनियन बँक आदी शेअरमध्ये घसरण झाली. त्याशिवाय आयटीसी, भारतीएअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक या शेअरवर दबाव दिसून आला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.