दीपकच्या कुटुंबीयांकडे मृतदेहाच्या अस्थी होत्या. पोलिसांनी त्यांची डीएनए चाचणी केली. त्यावरून अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह दीपकचा नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर दीपकचा शोध सुरू झाला. तपास गुन्हे शाखेनं हाती घेतला. मंगळवारी मडगाव पोलिसांनी हॉटेलांच्या नियमित तपासणीचा भाग म्हणून जुन्या रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये असलेल्या पाहुण्यांची यादी तपासली. तिथे दीपकनं त्याचं आधार कार्ड पुरावा म्हणून दाखवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दीपकला पकडलं आणि केरळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर केरळ पोलीस गोव्यात आले आणि त्यांनी दीपकला ताब्यात घेतलं.
गोव्यात येण्यापूर्वी जयपूर, दिल्ली, पंजाब फिरल्याची माहिती दीपकनं पोलिसांना दिली. दीपक काही दिवसांपूर्वीच मडगावच्या हॉटेलमध्ये आला होता. पोलिसांनी नेहमीच्या कामाचा भाग म्हणून हॉटेल मुक्कामी असलेल्यांची यादी तपासली आणि दीपक अलगद सापडला. कुटुंबीयांनी तुझे अंत्यविधी उरकल्याचं त्याला सांगण्यात आलं. इर्शाद नावाच्या तरुणाचा मृतदेह कुटुंबीयांनी तुझा म्हणून स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी त्याला दिली. ते ऐकून दीपकला धक्काच बसला. त्याहून मोठा धक्का कुटुंबीयांना बसला आहे. आपण हिंदू परंपरेनुसार मुस्लिम तरुणाचे अंत्यविधी केल्याचं समजल्यामुळे ते वेगळ्याच धक्क्यात आहेत.
Home Maharashtra dead man found alive, कुटुंबाकडून लेकाचा अंत्यविधी; ७ महिन्यांनी तोच गोव्यात जिवंत...
dead man found alive, कुटुंबाकडून लेकाचा अंत्यविधी; ७ महिन्यांनी तोच गोव्यात जिवंत सापडला; आता घरचे ‘धर्म’संकटात – declared dead and even cremated kerala man shows up alive in goa
मडगाव: केरळमधून बेपत्ता झालेला ३६ वर्षीय तरुण सापडला आहे. कुटुंबानं तरुण मुलाचा अंत्यविधी आटोपला, मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तोच तरुण आठ महिन्यांनी गोव्यातील हॉटेलमध्ये जिवंत सापडला. मडगावमधील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दीपक बालकृष्णन कंदी असं तरुणाचं नाव आहे. गोवा पोलिसांनी दीपकला ताब्यात घेत केरळ पोलिसांच्या स्वाधीन केलं.