Satyajeet Tambe | नाशिक पदवीधर मतदारसंघात मतमोजणीच्या दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना भरभक्कम आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आज सत्यजीत यांच्या विजयानंतर मोठा जल्लोष होणार होता. परंतु, सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत आज कोणताही विजयोत्सव होणार नाही, हे जाहीर केले आहे. मानस पगार यांचे निधन झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

हायलाइट्स:

  • खंबीर पाठीराखा गेल्याने सत्यजीत तांबे व्यथित
  • आज सकाळपासूनच सत्यजीत तांबे कोणाला दिसले नव्हते
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल स्पष्ट होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच सत्यजीत तांबे यांनी मविआच्या शुभांगी पाटील यांच्यासह अन्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत भरभक्कम आघाडी घेतली आहे. हे चित्र पाहता सत्यजीत तांबे यांच्या विजयाची आता केवळ औपाचारिकताच शिल्लक राहिलेला आहे. मात्र, हा विजय दृष्टीपथात असताना सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करुन महत्त्वाची घोषणा केली. नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये निधन झाले होते. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे मित्र आणि समर्थक म्हणून ओळखले जात होते. आपल्या मित्राच्या जाण्याने दु:खी झालेल्या सत्यजीत तांबे यांनी विजयोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे. त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. मानस पगार यांच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच राज्यभरातील काँग्रेस पक्षात आणि राजकीय वर्तुळात शोकाकुल वातावरण होते. सत्यजीत तांबे यांनीही सकाळीच ट्विट करुन खंबीर पाठीराखा गमावल्याची खंत बोलून दाखवली होती. आज नाशिकचा निकाल जाहीर होणार असूनही आज दिवसभर सत्यजीत तांबे बाहेर दिसून आले नव्हते. अगदी रात्र होत आली तरी सत्यजीत तांबे कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांनी ट्विट करुन विजयोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
Ajit Pawar: सत्यजीत तांबेच जिंकतील, नाशिकमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वीच अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

कोण होते मानस पगार?

मानस पगार हे नाशिक ग्रामीणचे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष होते. मानस पगार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. काँग्रेसने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी राबवलेल्या सुपर सिक्स्टी अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून २०२० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवा जोडो अभियान (सुपर १०००) अभियान राबवण्यात आले. या अभियानासाठी मानस पगार यांच्याकडे मुख्य समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here