space news today, आकाशातून जाणाऱ्या रहस्यमय वस्तूचं गूढ उलगडलं; नाशिक, विदर्भासह, नागपूरकरांनी नेमकं काय पाहिलं? – mysterious object seen in space in nashik and nagpur is not a comet but a satellite
नागपूर : गुरुवारी नागपूर, विदर्भ, नाशिकसह जळगावकरांनी एक खगोलशास्त्रीय घटना अनुभवली. आकाशातून एक प्रकाशमान वस्तू जात असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. सध्या उत्तरेकडे आकाशात एक धुमकेतू दिसत आहे. त्यामुळे तो हाच असा समज अनेकांचा झाला. मात्र, हा धुमकेतू नसून तो स्टारलिंक उपग्रह असल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी संध्याकाळी ७ वाजून २० मिनीटांनी ही वस्तू दिसली. ही वस्तू दक्षिणेकडून उत्तरेकडे जात होती. हा स्टारलिंक उपग्रह आहे. गेल्या चार वर्षांपासून अनेक ठिकाणी ते दिसतात. इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी २०१९ साली एकूण ५५ उपग्रह सोडण्यात आले होते. त्यातीलच हा एक असल्याचे खगोलशास्त्राचे अभ्यासक सुरेश चोपणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सध्या पृथ्वीवरून ग्रीन कॉमेट दिसतो आहे. जळगावकारंमध्ये खळबळ! सायंकाळी आकाशात दिसली रहस्यमय वस्तू; VIDEO पाहून तुम्हीही गोंधळाल
धुव्र ताऱ्याच्या दिशेने अर्थात उत्तरेकडे हा धुमकेतू दिसून येतो आहे व स्टारलिंक उपग्रहसुद्धा उत्तरेकडेच दिसल्याने अनेकांचा गोंधळ झाला. ग्रीन कॉमेट दुर्बिणीतूनच दिसतो आहे. साध्या डोळ्यांनी तो दिसत नाही. शहरापासून दूर ठिकाणी जाऊन फार लक्ष देऊन बघितल्यासच तो साध्या डोळ्यांनी दिसतो, असे चोपणेंनी सांगितले.
दरम्यान, अवकाशात गुरुवारी सायंकाळी सात वाजता दिसलेल्या रहस्यमय वस्तूने जळगावकरांमध्ये खळबळ उडाली. अवकाशातून जणू रेल्वे धावत असल्याचे दुर्मिळ चित्र जळगावकरांना दिसले. या वस्तूमुळे जळगाव करांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी आकाशात हे सॅटलाईट पाहिल्यामुळे नागरिक गोंधळल्याचंही पाहायला मिळालं.