हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पत्नीच्या अनैतिक वर्तनास कंटाळून पतीने गावाकडे येऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली पत्नी शेजाऱ्यासोबत संबंध प्रस्थापित करत असल्याची माहिती मिळाली. यावर पतीने कुटुंबिय, नातेवाईकांनी समजावल्यानंतरही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.

अखेर पतीनेच पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समज दिला. पण यावर दोघांनी पतीला आमच्यामध्ये पडू नको म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला कंटाळून पतीने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मयत अशोक दत्तराव भिसे (३५, रा. जरोडा, ता. कळमनुरी) याचे लग्न गावाशेजारील येलकी गावातील दुर्गा नावाच्या मुलीसोबत २००७ मध्ये झाले. त्यानंतर दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य झाली.

आकाशातून जाणाऱ्या रहस्यमय वस्तूचं गूढ उलगडलं; नाशिक, विदर्भासह, नागपूरकरांनी नेमकं काय पाहिलं?
कामानिमित्ताने ते औरंगाबाद येथे बजाजनगर येथे भाड्याने राहत व कंपनीत काम करत होते. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पत्नीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर पतीसोबत तिचे बिनसत गेले. पतीने सदरील बाब आई, भाऊ, सासू-सासरे यांच्या कानावर घातली. सर्वांनी तिची समजूत काढली व नीट राहण्याबाबत समज दिली. परंतु, तिच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही.

या प्रकरणी प्रभाकर दत्तराव भिसे यांच्या तक्रारीवरून पत्नी दुर्गा अशोक भिसे व तिचा प्रियकर शंकर (रा. हल्ली मुक्काम औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रियकराचे नाव विचारले असता मयताच्या घरच्यांना प्रियकराचे पूर्ण नाव माहिती नाही, असे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड करीत आहेत.

पत्नीनेच बॉयफ्रेंडसाठी दिला पतीला दम

पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समजावले. परंतु, त्या दोघांनी पतीलाच धमकी दिली. ‘तू आमच्यामध्ये पडू नकोस’, असा सज्जड दम देत जिवे मारण्याची धमकी दिली. एके दिवशी प्रियकरासोबत ती मुले पतीजवळ सोडून निघून गेली. त्यानंतर तो आपल्या मूळ गाव जरोडा इथे परतला व नातेवाईकांना सांगून माझ्या जीवनात काही अर्थ नाही, असे म्हणाला. ३१ जानेवारी रोजी त्याने जरोडा गावातील आबादानीजवळील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

भोळसर मुलाला घरी परत आणणं बापासाठी ठरलं अखेरचं; रात्री झोपेत असं काही घडलं की अख्खं गाव हादरलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here