मुंबईः राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मुंबईत मात्र नवीन रुग्णांची संख्या स्थिर आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यामुळं करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळतेय. मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख २० टक्क्यांनी खाली आला आहे. म्हणजेच १०० चाचण्यांमागे २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. मे महिन्यात हाच दर ४० टक्क्यांपर्यंत होता. तर, २२ मेमध्ये रुग्ण वाढीचा दरानं ५० टक्क्यांचा आकडा पार केला होता. ()

करोना रुग्णवाढीचा दर कमी झाल्यानंतर रुग्ण दुपटीचा दरही ६७ टक्क्यांवर आला आहे. मागील एका आठवड्यापासून करोनाचा ग्रोथ रेट १.०३ टक्क्यावर आला आहे. २१ ते २५ जुलैपर्यंत मुंबईत ३५ हजार ७४२ चाचण्या केल्या होत्या. या चाचण्यांदरम्यान ५ हजार २७३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

वाचाः

रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला असल्यानं हा एक प्रकारचा शुभ संकेत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं. मात्र, असे असले तरी अजूनही नागरिकांनी सतर्कता आणि खबरदारी बाळगणे गरजेचं आहे. अजूनही घराबाहेर पडताना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. मुंबई महानगरात चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. तसंच, चाचण्या अधिक वाढाव्यात यासाठी काहि नियमांतदेखील बदल केले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चाचण्या करण्याची परवानगी आता देण्यात आली आहे, अशी माहिनी मुंबई महानगर पालिका आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी दिली.

मुंबईतील नवीन करोना रुग्णांची संख्या घटली; डिस्चार्ज वाढले

करोनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेनं काही उपाय राबवले होते. अखेर पालिकेच्या या प्रयत्नाना यश येताना दिसत आहे. मुंबईत नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर रुग्णालयातून बरे होण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. २३ ते २७ जुलैमध्ये मुंबईत करोनाचे ५ हजार ५५७ नवीन रुग्णांची नोंद झाली. याचदरम्यान ६ हजार ८२८ लोकांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. सोमवारी मुंबईत १,०३३ नवीन रुग्ण सापडले तर, १ हजार ७०६ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सोमवारी राज्यात ७ हजार ९२४ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, एकूण ८ हजार ७०६ जणांनी करोनाची लढाई जिंकली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here