कुन्नूर: केरळच्या कुन्नूरमध्ये एक अतिशय दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गुरुवारी एका अपघातात जोडप्याचा मृत्यू झाला. जोडपं रुग्णालयात जात होतं. त्यावेळी कारनं अचानक पेट घेतला. दोघे कारमध्येच अडकले. तिथे असलेल्या अनेकांनी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यानंतरही जोडप्याचा जीव वाचला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे, महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्यानं पती तिला घेऊन रुग्णालयात नेत होता.एक चिमुकला जीव जगात येणार होता. त्याच्या आगमनाची चाहूल लागली. पत्नीला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यामुळे पती तिला घेऊन रुग्णालयाच्या दिशेनं निघाला. त्यावेळी रस्त्यात त्यांच्या कारला आग लागली. कारमध्ये जोडप्याच्या कुटुंबातील इतर काही सदस्य होते. ते वाचले. मात्र पती, पत्नीचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कारला लागलेली आग विझवली. मात्र त्यांना जोडप्याला वाचवता आलं नाही.तज्ज्ञांच्या मदतीनं कारची तपासणी करण्यात येईल. त्यातूनच अपघाताचं कारण स्पष्ट होईल, असं कन्नूर शहराचे पोलीस आयुक्त अजीत कुमार यांनी सांगितलं. कारमधील इतरांना काही झालं नाही. ते सुरक्षित आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवानं या अपघातात पती, पत्नीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कुमार यांनी दिली. मृत महिलेचं नाव रिशा असं आहे. तिचं वय २६ वर्षे आहे. रिशा त्यांचा पती प्रजीतसोबत रुग्णालयात जात होत्या. रिशा आणि प्रजीत यांच्यासोबत कारमध्ये आणखी ४ जण होते. ते अपघातातून सुखरुप बचावले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अद्याप अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही.
Home Maharashtra VIDEO: चिमुकल्या जीवाच्या आगमनाची चाहूल; जोडपं हॉस्पिटलकडे निघालं; कार पेटली, जिवंत जळालं