धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात तेव्हा सचिन तेंडुलकर आणि अन्य स्टार खेळाडू नव्हते. युवा खेळाडूंच्या या टीमने वर्ल्डकप जिंकून इतिहास घडवला होता. या संघातील अनेक खेळाडू प्रथमच जगासमोर आले आणि स्टार झाले. यात रोहित शर्मा आणि जोगिंदर शर्माचा समावेश आहे.
वाचा- IND vs AUS: कोण आहे भारतीय संघातला राजकुमार? नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडणार
निवृत्ती संदर्भात जोगिंदर शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेत आहे. माझे करिअर २००२ साली सुरू झाले आणि २०१७ पर्यंत मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मी बीसीसीआय, हरियाणा, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो. संघातील सहकारी क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. सर्वांनी दिलेल्या या प्रेमासाठी मनापासून आभार, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
जोगिंदरने भारतासाठी ४ टी-२० मॅच खेळल्या, यात ४ विकेट घेतल्या. तर ४ वनडेत १ विकेट आणइ ३५ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने १६ सामन्यात १२ विकेट आणि ३६ धावा केल्या. जोगिंदर सध्या हरियाणा पोलिसमध्ये DSP पदावर आहे.
टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजीकरत ५ बाद १५७ धावा केल्या होत्या. गौतम गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावा तर रोहित शर्माने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात पाकिस्तानला १३ धावांची गरज होती आणि धोनीने चेंडू शर्माच्या हातात दिला. २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेडूंवर मिसबाहचा कॅच श्रीसंतने घेतला आणि टीम इंडियाने विश्वविजेतेपद मिळवले.