धुळे: शहरातील पारोळा रोडवर कारचा अपघात झाला. अपघात झालेला पाहून आसपासच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी एक धक्कादायक बाब उघडकीस आली. अपघातग्रस्त कारमधून चक्क गुरांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. अपघातामध्ये वाहनातील गाय व बैलाचा मृत्यू झाला आहे.

कारमधून गोवंश जातीच्या ३ जनावरांची अवैधपणे वाहतूक सुरू होती. पारोळा रोडवरील गुरांच्या दवाखान्याजवळ कारचा भीषण अपघात झाला. कार रस्त्यावर उलटली. या घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून कारमधील एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर एक आरोपी फरार झाला असून ३ आरोपींना आझाद नगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.
VIDEO: चिमुकल्या जीवाच्या आगमनाची चाहूल; जोडपं हॉस्पिटलकडे निघालं; कार पेटली, जिवंत जळालं
गोतस्करांनी जनावरे कुठून आणली होती आणि ती कुठे नेली जात होती, तसेच या सर्व प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास आता आझाद नगर पोलीस करत आहेत. या अपघातामुळे गोवंश तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. गोतस्करांकडून आता चक्क टवेरा कारचा वापरदेखील जनावरे वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव या अपघातामुळे उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here