मुंबई: राज्यातील सरकारचं स्टिअरिंग मुख्यमंत्री यांच्या हाती आहे की उपमुख्यमंत्री यांच्या हा प्रश्न सध्या चर्चिला जातो आहे. सोशल मीडियावर देखील याची खमंग चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगानं ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’नं ट्विटरवर मागवलेल्या जनमतांचा कौल आला आहे.

‘मटा ऑनलाइन’च्या वाचकांनी अजित पवारांच्या बाजूनं स्पष्ट कौल दिला आहे. सुमारे ७३ टक्के लोकांनी राज्य सरकारचं स्टिअरिंग अजितदादांच्याच हाती असल्याचं मत नोंदवलं आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सरकार चालवत आहेत असं मत २७ टक्के वाचकांनी नोंदवलं आहे.

हेही वाचा:

भाजप-शिवसेनेत दुरावा आल्यानंतर शिवसेनेनं अत्यंत धाडसी निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि आठ महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून मान्यता मिळाली आणि ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. संसदीय राजकारणाचा कुठलाही अनुभव नसताना मुख्यमंत्रिपदी आलेले उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज व सरकार चालवण्याचा दांडगा अनुभव असलेल्या नेत्यांचं नेतृत्व कसं करणार हा प्रश्न तेव्हापासूनच चर्चिला जात आहे. मित्रपक्षाच्या नेत्यांच्या नाराजीमुळं त्यात भर पडत असते. शिवाय, विरोधी पक्षातील भाजपचे नेतेही उलटसुलट वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करत असतात.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हाती असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ही चर्चा थांबणं अपेक्षित होतं. मात्र, उद्धव यांच्या वाढदिवशी अजित पवारांनी एक सूचक फोटो ट्वीट केल्यानं पुन्हा त्या चर्चेला उधाण आलं. त्याच पार्श्वभूमीवर ‘मटा ऑनलाइन’नं ट्विटरवर वाचकांचा कौल घेतला होता. त्यात वाचकांनी अजित पवार यांच्या बाजूनं निर्विवाद कौल दिला आहे. तब्बल १४,७९७ लोकांनी या प्रश्नावर आपली मतं मांडली होती.

हेही वाचा:

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here