म.टा. प्रतिनिधी, नगरः करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूलात घट झाल्याने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली होती. ही रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्याचे त्यावेळी जाहीर केले होते. आता गणेशोत्सवाच्या आधी ही रक्कम देऊन सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा देऊ केला आहे. पुढील महिन्यात जुलैचा पगार देऊन झाल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी मार्चच्या वेतनातील राहिलेली रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ()

संभाव्य तूट आणि आगामी संकट लक्षात घेऊन सरकारने त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. सुरवातीला ही रक्कम पुन्हा मिळणार नाही, असे वाटत असतानाच ती दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार मार्च महिन्याचे एप्रिलमध्ये देण्यात आलेल्या वेतनातून ही कपात करण्यात आली होती. तेव्हापासून कपात केलेली ही रक्कम देण्याचे प्रलंबित होते. त्यावेळी कपात करताना पदनियहाय टक्केवारी ठरविण्यात आली होती. त्यानुसार उरलेली ही रक्कम देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची ६० टक्के, गट अ व ब अधिकारी वर्ग ५० टक्के तर उरलेल्या कर्मचाऱ्यांची २५ टक्के रक्कम द्यायची राहिली होती, ती आता देण्यात येणार आहे.

वाचाः

जुलै महिन्याचा पगार ऑगस्टमध्ये होईल. त्यानंतर तर मार्चमध्ये राहिलेल्या दुसऱ्या टप्प्याची ही रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, याचा दक्षता घ्यावी, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांचे मार्चचे दुसऱ्या टप्प्यातील वेतन द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

वाचाः

सेवार्थ प्रणालीद्वारे देण्यात येते. सध्या जुलै महिन्याचे वेतन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक गोष्टी लक्षात घेता दोन्ही वेतन आता एकत्र दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रथम जुलै महिन्याचे वेतन दिले जावे व त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यातील वेतन या प्रणालीद्वारे दिले जावे, मात्र ही प्रक्रिया गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here