रवी राऊत: यवतमाळ: संशयाचे भूत मानगोटीवर बसलेल्या प्रियकराचे प्रेयसी सोबत वाद झाले. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने तिच्या भावाच्या त्याच्या मित्राच्या मोबाईलवर आणि एका मैत्रिणीच्या इंस्टाग्राम आयडीवर पोस्ट केले. ही घटना ३० जानेवारी रात्री १०.१५ वाजता येथील वीज वितरण कार्यालय येथे उघडकीस आली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.बाभुळगाव तालुक्यातील रहिवासी असलेली एक तरुणी यवतमाळ येथे नोकरी करते. तिचे तीन वर्षांपासून आरोपी रितेश रामदास जयस्वाल (वय-२९) राहणार बाभुळगाव याच्याशी प्रेम संबंध होते. मात्र, काही दिवसांपासून तो संबंधित तरुणीवर संशय व्यक्त करत होता. त्यातून त्या दोघांमध्ये खटके उडाले. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान, ३० जानेवारीला सकाळी ८.३० वाजता ती येथील आर्णी मार्गावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापुढे असताना रितेश नीतीच्या व्हाट्सअॅपवर भावाला निर्वस्त छायाचित्र पाठवण्याची धमकी दिली.त्यानंतर त्याने ते छायाचित्र तिच्या भावाच्या आणि मित्राच्या मोबाईलवर पाठवले. एवढेच नाही तर एका मैत्रिणीच्या इंस्टाग्राम आयडीवरही छायाचित्र पोस्ट केले. त्याचे स्क्रीनशॉट काढून पीडित तरुणीच्या मोबाईल व्हाट्सअॅपवर पाठवले. यावरून पीडित तरुणीने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून आरोपी रितेश जयस्वाल यांच्या विरुद्ध भांदवी ३५४, ३५४ (अ), ३५४ (क), ३५४ (ड), ५०४, ५०६ आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या ६७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here