Authored by विशाल बडे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Feb 2023, 8:39 pm

Nashik Graduates constituency Election results | नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी मविआच्या शुभांगी पाटील यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. काँग्रेसचा पाठिंबा नसूनही तांबे पितापुत्रांनी विजय मिळवून नाशिकमधील आपली ताकद सिद्ध केली.

 

Satyajeet Tambe Vs Nana Patole
सत्यजीत तांबे Vs नाना पटोले

हायलाइट्स:

  • नागपूरमध्ये मिळालेल्या विजय हा एखाद्या नेत्याचा नव्हे
  • नागपूरमधील विजय हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे यश
  • सत्यजीत तांबे यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नाही
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला काहीसे अनपेक्षित यश मिळताना दिसले. नागपूर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्का देत अनुक्रमे मविआचे सुधाकर अडबाले आणि विक्रम काळे विजयी झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुंबईत ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’शी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी नागपूरमध्ये मिळालेल्या विजय हा एखाद्या नेत्याचा नव्हे तर तो कार्यकर्त्यांचा असल्याचे म्हटले. कुणीही यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले, असे नाना पटोले यांनी म्हटले. नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा ऐनवेळी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची याचा घोळ सुरु असताना सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी परस्पर सुधाकर अडबाले यांच्या नावाची घोषणा केली होती. निवडणुकीत सुधाकर अडबाले यांचा विजय झाल्यामुळे त्याचे सर्व श्रेय सुनील केदार यांचे असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी विदर्भातील विजय हा एकट्यादुकट्या नेत्याचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Explainer: सत्यजीत तांबेंनी नाशिकचं मैदान मारलं, पटोलेंनी नागपूरचा बालेकिल्ला जिंकला, पण काँग्रेसचं काय होणार?
यावेळी नाना पटोले यांना नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत आणि पर्यायाने सत्यजीत तांबे यांच्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर नाना पटोले यांनी म्हटले की, ‘सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर माझे बाळासाहेब थोरात यांच्याशी काहीही बोलणे झालेले नाही. तसेच सत्यजीत तांबे यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार का, असा प्रश्नही पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर पटोले यांनी म्हटले की, सत्यजीतला आता परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, निलंबनाचा निर्णय हायकमांडने घेतल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी नाशिकमध्ये आपली ताकद दाखवूनही नाना पटोले यांचा बाणा अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. आज सकाळीच नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांचा निर्णय हायकमांड घेईल, असे म्हटले होते. त्यामुळे तांबे यांच्या घरवापसीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, संध्याकाळपर्यंत नाना पटोले यांनी नवे विधान करुन या आशा धुळीस मिळवल्या आहेत.
Nashik Election: सत्यजीत तांबेंना निवडणुकीत राष्ट्रवादीकडून छुपी रसद? शरद पवारांची महत्त्वाची भूमिका

तांबे पितापुत्रांच्या निलंबनात पटोलेंची महत्त्वाची भूमिका

डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज भरला नव्हता. त्यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. तांबे पितापुत्रांच्या या खेळीमुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. नाना पटोले यांनी तातडीने समोर येत नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नाही, असे जाहीर करुन टाकले होते. तसेच डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यातही नाना पटोले यांनी पुढाकार घेतला होता. या माध्यमातून नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. परंतु नाशिकमधील सत्यजीत यांच्या विजयामुळे तांबे-थोरात यांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. तरीही काँग्रेसमधील आपल्याच सहाकाऱ्यांशी फटकून वागत असल्याचा आरोप असणाऱ्या नाना पटोले यांच्या वर्तनात कोणताही फरक पडलेला नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here