राम मंदिर बांधण्यापूर्वी मंदिराच्या परिसरात २००० फूट खाली टाइम कॅप्सूल ठेवण्याच्या योजनेवर ट्रस्टचे सदस्य चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची असून अशा वृत्तांवर ट्रस्टच्या अधिकृत विधानांची प्रतीक्षा केली पाहिजे, असं राय यांनी म्हटलंय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी टाइम कॅप्सूल संदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यावर चंपत राय यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
दर्शनाचा कालावधी वाढवला
अयोध्येत भगवान रामलल्लाच्या दर्शन कालावधीतही बदल करण्यात आला आहे. दर्शनाची वेळ एक तास आणखी वाढवण्यात आली आहे. अयोध्येत सकाळी दर्शनाची वेळ एक तासाने वाढवली गेली. आता रामलल्लाचे सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. यापूर्वी सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येत होतं. राम मंदिर बांधण्याच्या हाचलाची सुरू झाल्याने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरू आहे. यामुळे अयोध्येत भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times