नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या केरळच्या एका कपलचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या ट्रान्सजेंडर जोडप्यानं सोशल मीडियावर आपल्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. जीया आणि जहाद अशी या दोघांची नावं आहेत. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर याचे काही फोटोही शेअर केले आहेत.

कोझिकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याला लिंग बदलाची प्रक्रिया सुरू असताना गर्भधारणेसाठी कोणत्याही शारीरिक आव्हानाचा सामना करावा लागत नाही. जिया आणि जहाद हे दोघे गेल्या ३ वर्षांपासून एकत्र आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. जहाद स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुषात बदलला. आता या जोडप्याने मुल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर जन्माला येणाऱ्या बाळाला दूध बँकेकडून आईचं दूध पाजलं जाईल.

भारतातील मुलाला जन्म देणाऱ्या जहाद हा पहिला ट्रान्समॅन असणार आहे असा दावा केला जातोय. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान जहादचे स्थन काढण्यात आले असले जरी तिचा गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाही. यामुळे यांना आता गर्भधारणा करण्यात आली. जीयाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नाही. माझ्या आत एक स्त्री होती. मलाही मूल व्हावे आणि ते मला आई म्हणावे, असं आमचे स्वप्न’

दरम्यान, या जोडप्यांने आधी एक मुलगा दत्तक घ्यायची घोषणा केली होती. तसेच संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली, परंतु कायदेशीर कारवाई त्यांच्यासाठी खूप आव्हान आव्हानात्मक होती. कारण, हे एक ट्रांसजेंडर जोडपं होतं. पण आता या जोडप्याला बाळ होणार आहे.

आकाशातून जाणाऱ्या रहस्यमय वस्तूचं गूढ उलगडलं; नाशिक, विदर्भासह, नागपूरकरांनी नेमकं काय पाहिलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here