वॉशिंग्टन: डोळ्यांसाठी ड्रॉप तयार करणारी भारतीय कंपनी अमेरिकेत वादात सापडली आहे. डोळ्यांमुळे झालेल्या संसर्गामुळे अमेरिकेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतीय कंपनी ग्लोबल फार्मा हेल्थकेयरनं डोळ्यांचे ड्रॉप बाजारातून परत मागवले आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं याबद्दलची माहिती दिली आहे.

भारतीय कंपनीनं तयार केलेल्या डोळ्यांच्या ड्रॉपचा वापर केल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकन बाजारातून कंपनीचे ड्रॉप परत मागवण्यात आल्याचं एफडीएनं सांगितलं. एज्रीकेयर ड्रॉपच्या प्रतिकूल प्रभावाच्या एकूण ५५ घटना समोर आल्या आहेत. चेन्नईस्थित ग्लोबल फार्मा हेल्थकेयर कंपनीनं तयार केलेले ड्रॉप दूषित असल्याची शंका असल्यानं त्यांच्याकडून बाजारातील ड्रॉप परत मागवले जात असल्याची माहिती एफडीएनं दिली.
कार पळवली; कुटुंबाला संपवण्यासाठी कड्यावरून पाडली; भारतीयाच्या कारनाम्यानं अमेरिका सुन्न
भारतीय औषध कंपनीच्या डोळ्यांच्या ड्रॉपमुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये विविध प्रकारच्या संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे रोग नियंत्रण केंद्रानं याची सूचना एफडीएला दिली. ‘आतापर्यंत समोर आलेल्या घटनांमध्ये अनेकांनी दृष्टी गमावली आहे. अनेकांना डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. डोळ्यातून जास्त रक्तस्राव झाल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. या ड्रॉपचा वापर डोळ्यांची जळजळ थांबवण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी केला जातो,’ अशी माहिती एफडीएनं दिली.

या प्रकरणी ग्लोबल फार्मा हेल्थकेयरनं त्यांच्या संकेतस्थळावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ‘या उत्पादनाचं वितरण करणाऱ्या अरु फार्मा इंक आणि डेलसम फार्मा यांना डोळ्यांचे ड्रॉप बाजारातून माघारी बोलावण्याची आणि त्यांचा वापर बंद करण्याची सूचना केली आहे. या औषधाचा वापर केल्यानं काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा,’ असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.
पाय मोकळे करून येतो! नवरा घराबाहेर पडताच बायकोही निघाली; पती नको त्या स्थितीत सापडला अन्…
आर्टिफिशियल टीयर्स लुब्रिकेंट आय ड्रॉप्सचा वापर डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी केला जातो. ग्लोबल फार्मा हेल्थकेयर दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका, आफ्रिकेतील विविध देशांमध्ये केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here