Nandurbarv News : नंदुरबारमध्ये (Nandurbar) धक्कादायक घटना घडली असून प्रेमप्रकरणातून (Love Affair) एकाला जीवे मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून जमाव देखील संतप्त झाला आहे. परिणामी नंदुरबार पोलिसांनी घटनास्थळी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. 

नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात काल सायंकाळच्या सुमारास अरबाज खाटीक याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत ठार (Murder) केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित जयेश गंगावने यास पोलिसांनी (Nandurbar Police) ताब्यात घेतले असून परिसरात घटनेने खळबळ उडाली आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाहातून तरुणाची हत्या केल्याचे समजते आहे. नंदुरबार शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरालगत काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे. बहिणीला पळवून नेत विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावाने तिच्या पतीची हत्या केली आहे. 

नंदुरबार शहरात राहणाऱ्या अरबाज याने परिसरातीलच एका मुलीशी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने सदर हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण होऊन जमाव संतप्त झाला होता. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. 

नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात काल संध्याकाळच्या सुमारास जुन्या वादातून एकाने धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर घटनेनंतर प्रकारांत संशयित हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. मात्र खुनाच्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षकांसह सर्व पोलीस दलाने शांततेचे आवाहन केल्याचे पहावयास मिळाले. खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये आज अतिरीक्त कुमकसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

news reels reels

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here