मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये चोरट्यांनी एक अजब कारनामा केला आहे. एका दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी १५ फूट लांब भुयार खणलं. भुयारातून चोरटे दुकानात शिरले. त्यांनी ५ हजारांची रोख आणि ४५ हजारांचे आर्टिफिशियल दागिने चोरले. मात्र दुकानाची तिजोरी उघडण्यात त्यांना अपयश आलं.

मेरठच्या परतापूर रिठानी पीरजवळ दीपक लोधी यांच्या मालकीचं दागिन्यांचं दुकान आहे. गुरुवारी सकाळी दीपक यांनी दुकान उघडलं. त्यावेळी त्यांना आतमध्ये एक खड्डा दिसला. खड्ड्याची नीट पाहणी केल्यानंतर त्यांना ते भुयार असल्याचं समजलं. दुकानातून ५ हजारांची रोकड आणि ४५ हजारांचे आर्टिफिशियल दागिने चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पत्नीला संपवलं, जमिनीत पुरलं, ३० किलो मीठ टाकलं; वर शेत फुलवलं; कोणालाच शंका नाही, पण…
दीपक यांची चोरीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस दुकानात दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि फुटेज तपासले. त्यात चोर तिजोरी खोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. मात्र चोरट्यांना तिजोरी उघडण्यात अपयश आलं. चोरट्यांनी मालकासाठी एक विशेष संदेश लिहिला. ‘दुकानात चोरी करायला आला होतो. मात्र आम्ही अपयशी ठरलो. त्याबद्दल सॉरी. आम्हाला नाव कमवायचं आहे,’ असा संदेश चोरट्यांनी मालकासाठी लिहिला.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. दुकानाच्या बाहेर असलेल्या नाल्यातून चोरट्यांनी भुयार खणल्याचं त्यांच्या लक्षात आलं. भुयार जवळपास १५ फूट लांबीचं आहे. दुकानात असलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती चोरट्यांनी उलटसुलट करून पाहिली. त्यानंतर श्रीकृष्णाच्या हातात असलेली चांदीची बासरी पळवली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
थोराड नवरदेव अन् तरुण नवरी, दोन्ही परिवार राजी; सुरू झाले फेरे; कारनामा ऐकून मुलीकडचे उडाले
यानंतर चोरट्यांनी पुठा रोडवरील प्रवीण सरगम टेलिकॉम दुकानाचं कुलूप फोडून १० हजारांची रोकड, दोन लॅपटॉप, कॉम्प्युटर, एलसीडी, डेटा केबल, इन्व्हर्टर बॅटरी चोरली. या सगळ्याचं मूल्य जवळपास तीन लाखांच्या घरात जातं. चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. दुकान मालक आणि व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here