जळगाव : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील वाद सध्या चांगलाच गाजत आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, आपण कुणाला रोखू शकत नाही, पण तिने या गोष्टीचा विचार करावा असे मत अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले आहे. तर चित्रा वाघ यांचं नाव घेताच अल्काताईंनी हात जोडून प्रतिक्रिया देणं टाळलं.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सामाजिक संस्थांचा सन्मान सोहळ्यासाठी अभिनेत्री अलका कुबल आठल्ये या उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत्या होत्या.

अलका कुबल यांना उर्फी जावेदच्या पेहरावावरुन प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, मला एक अभिनेत्री म्हणून किंवा मी ज्या संस्कारात वाढले, मला ते पटत नाहीये, मात्र आपण कोणाला रोखू शकत नाही, कोण कसं फिरतंय ते, तिने या गोष्टीचा जरुर विचार करावा, मी माझी संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न करतेय, तिला जे योग्य वाटतेय, ती ते करतेय, पण एक प्रेक्षक म्हणून किंवा ज्या संस्कारात मी वाढले, आमच्या मनाला पटत नाही, असं अलका कुबल म्हणाल्या.

हेही वाचा : मी पळ काढत नाही…ऋतुराज गायकवाडसोबत लिंक-अपवर सायली संजीव स्पष्टच बोलली

प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, आपण ज्या समाजात वावरतोय, त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे, असे म्हणत अलका कुबल यांनी उर्फी जावेदला सल्ला दिला. यानंतर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचं नाव घेताच अलका कुबल यांनी ‘प्लीज मला राजकारणात कोणाबद्दल, प्लीज’ असं हात जोडून म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलं.

हेही वाचा : मराठीत अजूनही काम न करण्याचं हे एकमेव कारण म्हणजे…स्पष्टच बोलली काजोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here