वाचा:
‘प्लेगची साथ हाताळण्यावरून लोकमान्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावले होते. लोकमान्य आत्ता असते तर त्यांनी करोनाची साथ, सततचे लॉकडाऊन आणि सरकार व यंत्रणा यांची कार्यपद्धती यावरून काय भूमिका घेतली असती,’ असा प्रश्न पत्रकारांनी दीपक टिळक यांना विचारल्यानंतर टिळक आणि त्यांचे चिरंजीव व काँग्रेसचे तरुण नेते यांनी मिश्कीलपणे पाहिले.
वाचा:
‘प्लेगच्या साथीवेळी लोकमान्यांनी समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ती साथ हाताळण्यास सरकारला मदत होईल, अशीच भूमिका घेतली. मात्र नंतर सरकारने सैन्यावरील खर्चासाठी पुणेकरांवर कर लागू केला तसेच साथ हाताळताना दडपशाही सुरू झाल्याने लोकमान्यांनी कठोर भूमिका घेतली. आताही बळजबरी, भीती निर्माण करणे हा मार्ग असू शकत नाही,’ अशी टिप्पणी टिळक यांनी केली.
वाचा:
‘तेव्हाही जग भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत होते आणि आताही पाहते. देशातील उद्योग-व्यवसाय वाढावे म्हणून लोकमान्यांनी घेतलेली स्वदेशीची भूमिका आजही योग्य असल्याचे चीनने केलेल्या हल्ल्यानंतर अधोरेखित झाले आहे. देशातील रोजगार कमी होत असताना स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे,’ याकडे डॉ. टिळक यांनी लक्ष वेधले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.