भोपाळ: मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये अंधश्रद्धमुळे एका निष्पाप बाळाचा जीव गेला आहे. तीन महिन्यांच्या चिमुकलीला न्यूमोनियाची लागण झाली. आदिवासीबहुल भाग असलेल्या शहडोल जिल्ह्यातील चिमुकलीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. अंधश्रद्धेपोटी तिला ५१ वेळा लोखंडी सळईच्या डागण्या देण्यात आल्या. त्यामुळे चिमुकलीची प्रकृती आणखी बिघडली. यानंतर कुटुंबीय तिला घेऊन रुग्णालयात पोहोचले. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाला.

शहडोल जिल्ह्यातील सिंहपूर कठौतियामध्ये ३ वर्षांच्या मुलीला न्यूमोनियाची लागण झाली. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. अंधश्रद्धेचा पगडा असलेल्या कुटुंबीयांनी तिला एका वैद्याकडे नेलं. त्यानं मुलीला एक, दोनवेळा नव्हे, तर ५१ वेळा लोखंडी सळीनं चटके दिले. त्यामुळे चिमुकलीची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे कुटुंबीय तिला शहडोल वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांना मुलीला वाचवण्यात अपयश आलं.
अरेरे! बाल्कनीत टेकून बसायला गेला; अंदाज चुकला, अनर्थ घडला; सहाव्या मजल्यावरून खाली पडला
मुलीला लोखंडी सळीनं डागण्या देऊ नका, असं मुलीच्या आईला अंगणवाडी सेविकानं दोन-दोनदा सांगितलं होतं. मात्र तरीही चिमुकलीला सळईनं चटके देण्यात आले आहे, असं शहडोलच्या जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी सांगितलं. महिला बाल विकास विभागाचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले. तेव्हा त्यांनी ही घटना १५ दिवसांपूर्वीची असल्याचं समजलं. न्यूमोनियाचं संक्रमण वाढत गेल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्य यांनी दिली.
पत्नीला संपवलं, जमिनीत पुरलं, ३० किलो मीठ टाकलं; वर शेत फुलवलं; कोणालाच शंका नाही, पण…
मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात मुलांना डागण्या दिल्या जातात. ही प्रथा अनेकदा जीवघेणी ठरली आहे. लोखंडाची सळई तापवून मुलांना चटके दिले जातात. या प्रथेविरोधात प्रशासनाकडून जागरुकता अभियान राबवलं जातं. मात्र त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here