इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटानं हा प्रकार उत्तर प्रदेश पोलिसांच्या लक्षात आणून दिला. मेटानं दिलेल्या अलर्टच्या मदतीनं पोलिसांनी अभयचं घर शोधून काढलं. तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या आधीच पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी अभयला रोखलं. ‘अभय मूळचा कन्नोजचा आहे. काही दिवसांपूर्वी त्याला व्यवसायात ९० हजारांचा तोटा झाला. त्यामुळे त्यानं टोकाचं निर्णय घेतला. तो जीव देणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला रोखलं,’ असं गाझियाबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अंशू जैन यांनी सांगितलं.
अभय गाझियाबादच्या विजयनगरमध्ये वास्तव्यास आहे. तो आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अलर्ट मेटाकडून पोलिसांना मिळाला. त्यानंतर पोलिसांनी विजयनगरमध्ये धाव घेत अभयचं नेमकं लोकेशन शोधलं. त्यावेळी अभय आत्महत्येच्या तयारीत होता. त्यानं पंख्याला कापड लटकावून गळफास घेण्याची तयारी केली होती. तितक्यात पोलिसांनी त्याला रोखलं. अवघ्या १५ मिनिटांत पोलीस अभयच्या घरी पोहोचले.
Home Maharashtra suicide on instagram, अडचणींमुळे तरुण मेटाकुटीला; जीव देण्याची तयारी; तितक्यात ‘मेटा’ ऍक्टिव्ह;...