सोलापूर: सोलापूरहून उस्मानाबादला जाणाऱ्या एसटीमध्ये एका प्रवाशाचा आयफोन चोरीला गेला. यामुळे प्रवाशाने एसटी बस थेट पोलीस ठाण्यात नेण्याची मागणी केल्याने उस्मानाबादला जाणारी गाडी थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. जवळपास दीड तासानंतर ही बस उस्मानाबादकडे मार्गस्थ झाली.

पुन्हा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एसटी सोलापूर बस स्थानकातून उस्मानाबादकडे जात होती. दरम्यान एका प्रवाशाचा आयफोन चोरी गेला. या प्रवाशाने थेट पोलीस ठाण्यात एसटी घेऊन जाण्यास सांगितले. एसटीच्या वाहक व चालकाने ताबडतोब एसटी बस फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणली.
पप्पा कुठे आहेत? लेकीचा आईला भाबडा प्रश्न; सासूला संशय, बेडखाली पाहिलं तर…
सोलापूर बस स्थानकातून एसटी निघाली अन् आयफोन चोरीला
शुक्रवारी सायंकाळी एमएच ४० एन ९७३२ ही एसटी बस सोलापूर ते उस्मानाबाद निघाली होती. सम्राट चौक मार्गे जात असताना आपला आयफोन चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या प्रवाशाने ताबडतोब ही बस पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्याची विनंती केली. एसटी बस चालक व वाहकाने सम्राट चौक येथील पोलीस चौकीत एसटी बस वळवली. चौकीतील पोलिसांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले. फिर्याद देण्यासाठी प्रवाशाने एसटी बस चालक व वाहकाच्या मदतीने थेट फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणली.
पत्नीला संपवलं, जमिनीत पुरलं, ३० किलो मीठ टाकलं; वर शेत फुलवलं; कोणालाच शंका नाही, पण…
इतर प्रवाशी ताटकळत पोलीस ठाण्यात
साडेपाच वाजता सोलापूर बस स्थानकातून निघालेली एसटी बस सात वाजेपर्यंत सोलापुरातच होती. यामुळे इतर प्रवासी आम्हाला जाण्यासाठी उशीर होत आहे. लवकर सोडा असे म्हणत पोलिसांकडे विनंती करत होते. यामुळे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक प्रवाशी मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी फौजदार चावडी पोलीस स्टेशन मध्ये होता.

पोलिसांनी सर्व बसची झडती घेतली
फौजदार चावडी पोलिसांनी सर्व प्रवाशांची झडती घेतली. बसमधील इतर प्रवाशांकडून काही सापडले नाही. दरम्यान ज्या तरुणाचा मोबाईल हरवला होता त्याने पोलिसांना शनिवारी येऊन तक्रार देऊ असे सांगितले. त्यानंतर एसटी बस उस्मानाबाद कडे मार्गस्थ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here