नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय लढाई निवडणूक आटोपल्यानंतरही संपायला तयार नाही. किंबहुना आता या लढाईला खऱ्या अर्थाने तोंड फुटल्याचे दिसत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढाकाराने सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. काँग्रेस पक्षाने निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना पाठिंबाही दिला नव्हता. सत्यजीत तांबे यांनी शनिवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याचा हिशेब चुकता केला. यावेळी सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेब थोरात आणि तांबे घराण्याला काँग्रेसमधून बाहेर करण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले होते.

सत्यजीत तांबे यांनी आरोपांच्या फैरी झाडून काही तास उलटत नाही तोच आता बाळासाहेब थोरात यांच्या मुलीने या लढाईत उडी घेतल्याचे दिसत आहे. बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून शरयू देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. शरयू यांनी एक शायरी ट्विट केली आहे. तुम लाख कोशिश करलो, मुझे बदनाम करने की; मैं जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ…, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शरयू देशमुख यांच्या या वक्तव्याचा रोख नाना पटोले यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

शरयू देशमुख या आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखल्या जातात. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोराता यांना लक्ष्य करणाऱ्या भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनाही शरयू देशमुख यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. ‘महसूल मंत्री’ पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत, असे पडळकर यांनी म्हटले होते. त्यावर शरयू देशमुख यांनी म्हटले होते की, ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’, अशी टिप्पणी करत शरयू देशमुख यांनी हिशेब चुकता केला होता.
नाना पटोलेंनी १० तास माझ्या माणसाला बसवून ठेवलं आणि चुकीचे एबी फॉर्म पाठवले: सत्यजीत तांबे

सत्यजीत तांबे यांनी नेमकं काय म्हटलं?

नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण उभे राहणार, याचा निर्णय आम्ही शेवटच्या क्षणी घेऊ, असे आम्ही एच. के. पाटील यांनी कळवले होते. पण त्यानंतर एखाद्या स्क्रिप्टनुसार घडामोडी घडत गेल्या आणि मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यापासून दूर ठेवण्यात आले. हे सर्व बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे परिवाराला काँग्रेसबाहेर ढकलण्यासाठी रचलेले कारस्थान होते, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here