म. टा. प्रतिनिधी, सांगलीः सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे घराच्या छतावर आलेली माकडे हुसकावण्यासाठी एअरगनने छरे मारल्याप्रकरणी सुनीलदत्त पांडुरंग जाधव (वय ४०, रा. कडेगाव) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. जाधव याने सोमवारी (ता. २७) घराच्या छतावरून हवेत छरे मारल्यानंतर घाबरून एका माकडाचा मृत्यू झाला होता. वन विभागाच्या अधिका-यांनी जमिनीत पुरलेले मृत माकड बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन केले.

वाचाः

वन विभागाचे अधिकारी मदन क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कडेगाव येथे एका व्यक्तीने छ-याच्या बंदुकीने माकड मारल्याची तक्रार वन विभागाकडे आली होती. मृत माकडाचे गावातच रिकाम्या जागेत दफन केले होते. यानुसार चौकशी करताना सुनीलदत्त जाधव याने घराच्या छतावरील माकडे हुसकावून लावण्यासाठी त्याच्याकडील छ-याच्या बंदुकीतून छरे मारल्याचे स्पष्ट झाले. अधिका-यांनी तातडीने कडेगाव पोलिसांच्या मदतीने जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील छ-याची बंदूक जप्त केली. माकडाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभागाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी माकडाचा मृतदेह बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिका-यांकडून शवविच्छेदन केले. यात त्याच्या अंगावर कोणतीही जखम आढळली नाही. मात्र, बंदुकीच्या आवाजाच्या भीतीने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय अधिका-यांनी व्यक्त केला.

संशयित आरोपीने माकडांना हुसकावून लावणे, त्यांना जखमी करणे, मृत करणे या उद्देशाने एअरगनने छऱ्ये फायर केल्याने वन्यजीव अधिनियम १९७२ मधील कलम २(१६)(अ, ब), ९,३९,५० व ५१ अंतर्गत शिकारीचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर हजर केले असता, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई सांगलीचे सहायक वनसंरक्षक गजानन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनरक्षक अभिजीत कुंभार, राजेश पाटील, वनरक्षक अनिल कुंभार यांच्या पथकाने केली. कडेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विपीन हसबनीस यांनी आरोपीला अटक करून त्याचा ताबा वन विभागाकडे दिला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  3. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here