कोल्हापूर: रुग्णांची संख्या रोज वाढत असतानाच जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून बाधितांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. मंगळवारी एका दिवसात करोना संसर्गाचे नऊ बळी ठरल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बाधितांची संख्या पाच हजाराच्या जवळ पोहचली आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात करोना संसर्गाचे प्रमाण फारच कमी होते. जुलै महिन्यात त्याचा कहर सुरू झाल्याने हाहाकार माजला आहे. रोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळत आहेत. गेल्या दहा दिवसांत तब्बल दोन हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात २२९ नवे रुग्ण सापडल्याने हा आकडा आता ५८२९ पर्यंत पोहोचला आहे. उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने उपचार करण्यात अडचणी येत आहेत. बाधितांना ठेवण्यासाठी आता शहरातील मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. शिवाजी विद्यापीठातील वसतीगृहात देखील बाधितांवर उपचार करण्यात येणार आहेत.

गेल्या आठ दिवसापासून करोना बाधितांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ झाली आहे. मंगळवारी सात पुरूष व दोन महिलांचा बळी गेला. यामध्ये कोल्हापूर शहरातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे बळींची संख्या १३८ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत १९३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या २७५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, खासगी दवाखान्यात सध्या डॉक्टरांकडून रुग्णांची लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत महापौरांनी एक आढावा बैठक घेतली. खासगी डॉक्टरांनी करोना रुग्णांवरील उपचारासाठी सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे बिल आकारणी करावी. अन्यथा खाजगी हॉस्पिटलवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर निलोफर आजरेकर यांनी दिला.

ऑन द स्पॉट नोकरी

कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेषता शहरात देखील काही दिवस करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा आणि यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने ऑन द स्पॉट निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त यांनी दोन दिवस मुलाखती घेऊन २० डॉक्टर, ६५ नर्स, सात कंपाउंडर, दोन लॅब टेक्निशियन, एक इसीजी टेक्निशियन यांना ऑन दि स्पॉट नियुक्तीपत्रे दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here