बुलढाणा : मेहकर ते खामगाव या मार्गावरून धावणाऱ्या एसटी बसला पाथर्डीच्या घाटात अपघात झाला असून, या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. नादुरुस्त अवस्थेतील ही बस अक्षरशः काळ बनली होती. परंतु, चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बसच्या स्टेअरिंगचा रॉडच निघून आल्याने ही बस एका झाडाला धडकली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांसह चालकाला रुग्णवाहिकेद्वारे मेहकर येथे हलवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर ते खामगाव गाडी क्रमांक (एम. एच. ४० एन ८२८९) या गाडीला घाटात अपघात झाला. बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक रणवीर कोळपे, कार्यशाळा अधीक्षक हर्षल साबळे, प्रवीण तांगडे, अंकुश शिंदे, संजय मापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त प्रवाशांना देऊळगाव साकरशाचे सरपंच संदिप अल्हाट, रोहिदास जाधव, जानेफळचे कृष्णा हावरे, रामदास धामोडकर, राहुल राठोड यांनीही मदत केली.

महिला अंघोळीला गेली, इकडे शेजाऱ्याने डाव साधत केलं भयानक कृत्य

दरम्यान, अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातील बस आगार नवीन बसच्या प्रतिक्षेत आहे. मात्र अद्यापही नव्या बसेस मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जुगाड पद्धतीने जुन्याच गाड्यांवर प्रयोग करून या गाड्या रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप होत आहे.

जखमी प्रवाशांची नावे

कासाबाई बबन अवचार (वय ६२, रा. कोठा शिवार, ता. मालेगाव, जि. वाशिम), सुरेश जर्नाधन खराटे (वय २७, रा. जोगेश्वरी, ता. रिसोड), सौ. प्रयगाबाई जनार्धन खराटे (वय ६०, रा. जोगेश्वर, ता.रिसोड), शेख यासीन शेख खुबन (वय ७०) रा. नवघरे मंगरूळ, ता. चिखली, अब्दुल रशीद अब्दुल कादीर (वय ७०) रा. बाळापूर, जि. अकोला, मनोरमा गबाजी मिसाळ (वय ६५) रा. मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेडराजा, रोशनी घनश्याम जाधव (वय १५), ऋतुजा जीवन जाधव (वय १५), शंकर रामा कांबळे (वय ७५) रा. मारूती पेठ, मेहकर, सीताराम नानु चव्हाण (वय ७५), रा. शिर्ला नेमाने, ता. खामगाव, कु. प्रिती बुढन मार्कड (वय १५ वर्षे), रा. लाखनवाडा, भावेश मुलचंद राठोड (वय १६) रा. पाथर्डी, हरिभाऊ त्र्यंबक सोळंके (वय ६५) रा. पारखेड फाटा, अनुसया हरिभाऊ सोळंके (वय ५५) रा. पारखेडफाटा, कविता गोपाल एकनाथ (वय १९), अमित घनश्याम जाधव (वय १६), रा. पाथर्डी, कु. स्नेहा केवलसिंग चव्हाण (वय १६), रा. पारखेड, किरण मुरलीधर राठोड (वय १८), रा. पारखेड, कु. अश्विनी वैâलास राठोड (वय १६) रा. पाथर्डी, कु. रेखा प्रकाश चव्हाण (वय १६) रा. पारखेड, कु. वेदिका सुरेश जाधव (वय १६) रा. पारखेड, कु. आरती गणेश राठोड (वय १६) रा. पारखेड, कु. कोमल रोहिदास राठोड (वय १६) रा. पारखेड, राणी नवलचंद जाधव (वय १६), रा. पारखेड, सोनू संतोष जाधव (वय १६) हे प्रवासी बस अपघातात जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here