धुळे : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, आताही गिरीश महाजन यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धुळे शहरात आज झालेल्या ‘हिट धुळे फिट धुळे’ या मॅरेथॉन स्पर्धेत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आपल्या खास अंदाजमध्ये भन्नाट झुम्बा डान्स पाहायला मिळाला.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, कशा प्रकारे गिरीश महाजन हे मोठ्या उत्साहाने डान्स करत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक तरुणांनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. तर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्येही उत्साह पाहायला मिळाला.