नवी दिल्लीः पूर्व लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर हिंद महासागरात सर्व आघाडीच्या युद्धनौका आणि पाणबुड्या आक्रमकपणे तैनात करून भारतीय नौदलाने बीजिंगला एक स्पष्ट संदेश दिला आहे. चीनला भारताची आक्रमकता समजून घेत आहे, असं सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं. लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनला भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर सीमेवरील तणाव आणखी वाढला. या पार्श्वभूमीवर हिंद महासागरात आपल्या प्रमुख युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात करत भारतीय नौदलाने आपला हेतू स्पष्ट केला आहे.

तिन्ही दलांकडून चीनला स्पष्ट संदेश

लष्कर, हवाई दल आणि नौदलासह राजनैतिक आणि आर्थिक मार्गांद्वारे बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारून पूर्व लडाखमधील चीनची आक्रमण मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत भारताने चीनला दिले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि चीनला भारताच्या स्पष्ट संदेशाबद्दल जागरूक करण्यासाठी सैन्याच्या तिन्ही दालांचे प्रमुख जवळपास रोज चर्चा करत आहेत. सीमेवरील वादावर सैन्याच्या प्रत्युत्तरावर तिन्ही दल एकत्रितपणे काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मालाक्काची सामुद्रधुनी आणि आसपासचा परिसर चीनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे भारतीय नौदलाने हिंद महासागर क्षेत्रात युद्धनौका आणि पाणबुड्यांची तैनात करून चीनवर दबाव वाढवला आहे.

चीन भारताचा संदेश समजत आहे. चीनने भारताच्या तैनातीला प्रतिसाद दिला आहे का? याविषयीही सूत्रांनी माहिती दिली. हिंद महासागरात चिनी जहाजांच्या हालचालींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अमेरिकेच्या तीव्र विरोधानंतर पीएलए नेव्हीने दक्षिण चीन समुद्रात अत्यधिक संसाधनं ठेवली आहेत. जहाजांच्या वाहतुकीचे स्वातंत्र्य प्रदर्शित करण्यासाठी अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात अनेक जहाजं पाठविली आहेत. तसंच चीनशी प्रादेशिक वाद असणार्‍या देशांना अमेरिका पाठिंबा देत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय नौदलाने आपली भूमिका वाढविली

वेगाने बदलणार्‍या प्रादेशिक सुरक्षेच्या परिस्थितीचा विचार करता अमेरिकन नेव्ही, जपानची मेरीटाईम सिक्युरिटी फोर्सबरोबर संचलन सहकार्य वाढवत आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हवाई दलाने सुखोई-३० एमकेआय, जग्वार आणि मिरज २००० अशी सर्व प्रमुख लढाऊ विमानं पूर्व लडाखमध्ये आणि प्रत्यक्ष ताबा र रेषेजवळ तैनात केली आहेत. गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात चिनीचेही नुकसान झाले आहे. परंतु त्याबद्दल चीनने काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, अमेरिकन गुप्तचर अहवालानुसार, ३५ चिनी सैनिक ठार झालेत. गॅलवान खोऱ्यातील घटनेनंतर एलएसीवरील चीनच्या कोणत्याही हरकतील योग्य उत्तर देण्यासाठी सरकारने सैन्य दलाला ‘पूर्ण स्वातंत्र्य’ दिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here