(सुनील नलावडे): रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखत आपला गड कायम राखला असला तरी या निवडणुकीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

संघर्षमय झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी १०९२ मतांनी विजयी झाले. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली आहे सेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांनी भाजपा समांतर खालोखाल मते मिळवल्याने शिवसेनेचा विजय सुकर झाला एका परीने सेनेला आपले अस्तित्व दाखवता आले त्यामुळे भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

या निवडणुकीत शिवसेनेकडून आजच मंत्री झालेले उदय सामंत यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती. खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनीही या मतदार संघात प्रचाराची सूत्रे हलवली होती. रत्नागिरी पालिकेत शिवसेनेचे एकहाती बहुमत असून २४ विद्यमान नागरसेवसक व जिल्हा परिषद ताब्यात असताना भाजपने यावेळी प्रथमच जोरदार संघर्ष देत शिवसेनेचा वारू अखेरच्या मतमोजणी फेरीमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेचा १०९२ मतांनी विजय झाला.

या निवडणुकीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, चित्रा वाघ अशी दिग्गज मंडळी उतरवली होती आमदार प्रसाद लाड या मतदारसंघात ८ दिवस तळ ठोकून होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहरात पायी प्रचार फेरी काढून रंगत भरली होती तसेच शहरातील सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या दारी जाऊन प्रचाराची आगळी पद्धत अवलंबली होती मात्र एवढी मोर्चे बांधणी करूनही भाजपला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला व पुन्हा एकदा उदय सामंत यांनी आपली चतुराई सिद्धकरत जेमतेम गड राखला एवढेच म्हणावे लागेल.

२४ नगरसेवक असलेल्या शिवसेनेचे प्राबल्य असूनही या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी जवळपास ८००० मते घेऊन त्या दोन्ही पक्षांनी आपला मतदार कायम राखल्याचे दाखवून दिले

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here