नागपूर: खंडणी व अवैध सावकारी प्रकरणात नागपूर एमआयडीसीतील झीरो डीग्री बारचा मालक (वय ४०, रा. भेंडे ले-आऊट) याच्यासह चौघांना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. (वय २८,रा. खामला), (वय ३३, रा. गोपालनगर) आणि समीर ऊर्फ बाळा राऊत (वय २८, रा. गोपालनगर),अशी अटकेतील अन्य आरोपींची नावे आहेत. तिघेही कुख्यात गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वीच तिघेही एका प्राणघातक हल्ला प्रकरणात जामिनावर सुटले होते.

वाचा:

चायनीज ठेलाचालक समीर दिलीपराव इंगळे (वय २८, रा.गोपालनगर) याला पैशाची गरज होती. त्याने तपन याच्याकडून १५ टक्के व्याजाने ७० हजार रुपये घेतले. समीर याने तपन याला १ लाख ७० हजार रुपये दिले. मात्र त्यानंतरही तपन हा समीर याला पैशाची मागणी करायला लागला. अन्य तीन साथीदारांच्या मदतीने त्याला धमकी दिली. समीर याच्याकडून बळजबरीने धनादेश घेतले. याशिवाय त्याला पुन्हा २० हजार रुपये व्याजाने दिले. त्यानंतर तपन हा त्याला त्रास द्यायला लागला. समीर याने गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली. गुन्हेशाखा पोलिसांनी तपन व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध बजाजनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री तपन व त्याच्या साथीदारांना अटक केली. मंगळवारी पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

वाचा:

कुख्यात गोलू मलिये होता चालक

मधील दाम्पत्यावर झालेला गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार कुख्यात गोलू मलिये हा तपन याचा चालक होता. गोलूच्या मदतीने तपन याने अनेकांकडून बळजबरीने पैसे उकळले. कळमेश्वरमधील गोळीबाराचा कटही तपन याने आखला होता,अशी माहिती आहे.

घरझडतीत आढळले दस्तऐवज

तपन याला अटक करताच गुन्हेशाखा पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्या घरून मोठ्या प्रमाणात करारचे दस्तऐवज जप्त केले. पोलिसांना एक डायरीही आढळली. त्याने कोणाला किती पेसे दिले, किती व्याज घेतले, याचा तपशील या डायरीत आहे. तपनविरुद्ध आणखी तीन तक्रारी आल्या आहेत. त्याचा तपास सुरू असून, लवकरच गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती गुन्हेशाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here