मुंबई : एकीकडे रामचरितमानसवरून वाद सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिव्यवस्थेवर भाष्य केले आहे. जात ही देवाने नाही तर ती पंडितांनी निर्माण केली आहे. देवाने नेहमीच सांगितले आहे की माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी एक वर्गवारी केली जी चुकीची होती, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

मुंबईत संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान संघ प्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. देशात विवेक, चेतना या सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, फक्त मते भिन्न आहेत.

क्लिक करा आणि वाचा- बीआरएस पक्षाची राज्याच्या राजकारणात एंट्री, दोन माजी आमदारांचा प्रवेश, राव यांनी मोदींना ललकारले

सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आहे. याचा फायदा घेऊन आपल्या देशात हल्ले झाले. याचा बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा घेतला. देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसत आहे का, असा सवाल त्यांनी केला. कोणताही ब्राह्मण तुम्हाला हे सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपल्या आजीविकेचा अर्थ समाजाप्रती जबाबदारी हा देखील असतो. जर प्रत्येक काम समाजासाठी असते, तर मग कोणी उच्च, कोणी नीच, किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात, असेही भागवत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मन सुन्न करणारी घटना! १० वर्षांपूर्वी वडिलांना संपवले, आता आईलाचाही घेतला जीव, पेंशनसाठी मुलगा बनला हैवान

भागवत यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचं स्वागत केलं.

mohan bhagwat in Shri Siddhivinayak Temple

मोहन भागवत यांनी घेतले श्री. सिद्धिविनायकाचे दर्शन

क्लिक करा आणि वाचा- लग्न झाले, धुमधडाक्यात वरातही निघाली, नवरीच्या चेहऱ्यावरील पदर उचलताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here