पुणे: कार्यालयीन कामकाज करण्याबरोबरच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे गुंतले असताना, गेल्या चार महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, तसेच आणि या दिवशीही सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.

वाचा:

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सुमारे ३० ते ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज सांभाळत त्यांच्याकडून अतिरिक्त काम सांभाळण्यात येत आहे. विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सुटी जाहीर केली आहे. याशिवाय एक सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि १८ ऑक्टोबरला घटस्थापनेला राज्य सरकारी कार्यालयांना सुटी असणार आहे.

वाचा:

पुण्यातील आकडे चिंता वाढवणारे

पुणे शहर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २६१८ जणांना करोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर करोनाला रोखण्याचे आव्हान आणखी वाढले आहे. दिवसभरात ५९१ जणांना पुण्यात बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले असून शहर जिल्ह्यात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here