रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खानापुर ता. वाई येथील अभिषेक जाधव या युवकाच्या खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सातारा पोलिसांच्या पथकाला दापोली पोलिसांच्या मदतीने यश आले आहे. दापोली शहरातील बुरोंडी नाका येथे हर्णै मार्गावर असलेल्या सागरी पोलीस चेक नाका येथे या तिघांचे मुसक्या आवळण्यात यश आल आहे.

शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमाराची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे साताऱ्यातून कोकणात दापोली तालुक्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. यावरून मोबाईल लोकेशन ट्रेसआउट करून सातारा पोलिसांचे पथक दापोली इथे दाखल झाले होते. सातारा पोलिसांचे पथक गेले दोन दिवस दापोली तालुक्यात या संशयित आरोपींसाठी सर्च ऑपरेशन करत होते. पोलिसांच्या पथकाला हे तीनही संशयित आरोपी चकवा देत होते. दुचाकीवरून ट्रिपल सीट हे आरोपी हर्णैकडून दापोलीच्या दिशेने येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. अखेर सापळा रचून पोलिसांनी वेशांतर केले. दापोली शहरातील बुरोंडी नाका चेक पोस्ट येथे मोठ्या शिताफीने झडप घालून या तीघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले
सातारा येथील खानापूर (ता. वाई) येथील २२ वर्षाच्या एका युवकाचा परखंदी – शेंदूरजणे गावाच्या सीमेवर असलेल्या एका शेतात दगडाने व तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आले. अभिषेक रमेश जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. बहिणीबरोबर असलेल्या प्रेम प्रकरणातून गावातील मित्रानेच ही हत्या करून त्याचा काटा काढला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं होत.

साताऱ्यात २० वर्षीय तरुणाला संपवलं, हत्येचं गूढ उकललं; ‘या’ कारणामुळे मित्रानेच काढला काटा
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेबंदर इथे दोन दिवसांपासून भुईंज पोलीस ठाण्याचे सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, मोहिते आणि एलसीबीचे सचिन ससाणे, धिरज महाडीक हे सर्व वेषांतर करून सापळा लावून बसले होते. त्यावेळी तपास कामातील तांत्रिक बाबींचा वापर करून अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास आरोपी रहीम मुलाणी व प्रज्वल जाधव व अन्य एक संशयित आरोपीला झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सातारा जिल्हा व राज्यासह परराज्यातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे यांनी जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तपास तात्काळ होण्यासाठी पोलीस पथके तयार केली होती. या तपास कामात अवघ्या तीस तासात यश प्राप्त केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे, आशीष कांबळे, महिला पिएसआय स्नेहल सोमदे तसेच दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू नलावडे व उपनिरीक्षक अशोक गायकवाड यांचीही सातारा पोलिसांच्या पथकाला मोठी मदत झाली.

आकाशातून जाणाऱ्या रहस्यमय वस्तूचं गूढ उलगडलं; नाशिक, विदर्भासह, नागपूरकरांनी नेमकं काय पाहिलं?

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here