इंदौरः मध्य प्रदेशातील मंत्री तुलसी सिलावट यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याने ते चर्चेत आलेत. हे मध्य प्रदेशचे मुख्यंत्री होतील, असं वक्तव्य सिलावट यांनी केलंय. यासबोतच १५ दिवसांत शिंदे हे भूमिपूजनालाही येतील असा दावा केला. सिलावट यांचे वक्तव्य माध्यमांमधून प्रसारती होताच काँग्रेसने यावरून चिमटा काढला आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदारांसोबत हीच डील झाली होती, असं काँग्रेसनं म्हटलंय. सिलावट यांनी यापूर्वी पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देशावरील कलंक असल्याचं वक्तव्य केलं होतं.

इंदौरच्या सांवेर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीत असलेले शिंदे समर्थक मंत्री तुलसी सिलावट यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुख्यमंत्री झाल्यावर ज्योतिरादित्य शिंदे हे सांवेरमध्ये भूमिजनाला येणार असल्याचं सिलावट यांनी जाहीर केलंय. यामुळे मुख्यमंत्री हे राजीनामा देणार आहेत, असा टोला काँग्रेसनं लगावला आहे.

करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा राजीनामा निश्चित आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील आणि ते १५ दिवसांत सांवेरमध्ये भूमिपूजनाला येणार आहेत, असं काँग्रेसच राज्य सचिव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि प्रेस नोट जारी करत म्हटलंय. सिलावट यांनी घोषणा केली त्यावेळी इंदौर भाजपमधील अनेक बडे नेते उपस्थित होते. पण कुणीही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या बाजूने आवाज उठवला नाही. भाजपचे सर्व जुने नेते आता सतरंजी उचलण्याचे काम करत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली.

शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आमदारांचे मन वळण्यात येत आहे. भाजप नेतृत्व शिंदेसोबत आहे, अशा विश्वास त्यांना दिला जातोय. शिवराजसिंह यांच्यामुळे भाजप निवडणूक जिंकू शकत नाही. यामुळे शिंदेच्या हाती सूत्र देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे पोटनिवडणुका टाळल्या जात आहेत. विश्वासघात करणाऱ्यांना साथ देणारे शिवराजसिंह चौहान यांचाही आता विश्वासघात होणार आहे, अशी टीका काँग्रेस सचिव राकेश यादव यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here