नाशिक: नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लाईट गेल्यामुळे मेणबत्तीच्या प्रकाशात गॅरेजचे काम करत असतांना मेणबत्ती पडल्याने जवळच असलेल्या थिनरने पेट घेतला. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा आगीत गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी गॅरेज मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे दोघेही मुलं जवळ असल्याने त्यांना वाचवण्यासाठी त्यांना धडपड केली परंतु त्याचा यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरात घडली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंबड परिसरातील कृष्णा राजकुमार विश्वकर्मा वय-२९, रा. इंडोलाईन कंपनीच्या मागे, अंबड, नाशिक हे घराजवळीलच स्वतःच्या मालकीच्या असलेल्या वा.सु. विश्वकर्मा मोटर्स या गॅरेज मध्ये काम करत होते. या दरम्यानच विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांनी गॅरेजमध्ये मेणबत्ती लावून त्यांचे काम चालू केले यावेळी मेणबत्ती खाली पडल्याने खाली असलेल्या थिनरने काही क्षणातच पेट घेतला त्यावेळी कृष्णा विश्वकर्मा हे मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाले होते. त्यांचे दोघे मुलं देखील यावेळी गॅरेज मध्येच होते वडिलांच्या कपड्यांनी पेट घेतल्याने बघून त्यांनी वडिलांजवळ जाण्यासाठी सुरुवात केली.वाचाः पोटच्या मुलांना इजा होऊ नये म्हणून कृष्णा विश्वकर्मा यांनी दोघ मुलांना स्वतःपासून दूर ढकलून देत स्वतःच आग वझविण्यासाठी प्रयत्न करू लागले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना कृष्णा विश्वकर्मा हे गंभीर भाजले गेले परिसरातील नागरिकांनी आग विझवत पुढील उपचारासाठी त्याचा भाऊ पिंटु राजकुमार विश्वकर्मा याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. दोघा लहान चिमुकल्या समोरच वडील भाजले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वाचाः
Home Maharashtra शेवटी बापाचं काळीज ते! लेकरांना वाचवण्यासाठी जीवाची धडपड, मुलांच्या डोळ्यांदेखत वडिलांचा अंत