भारतात ९ लाख, ७१ हजार, ३३० कोविड रूग्ण बरे झाले आहेत. तर ५ लाख, ११ हजार, ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ८९४४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, असं वर्ल्डोमीटर वेबसाइटने म्हटलंय. भारतात प्रति लाख लोकसंख्येत एकूण १,०९८ कोरोना रुग्ण आहेत. तर या महामारीमुळे दहा लाख लोकसंख्येच्या हिशेबाने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात एकूण १ कोटी, ७३ लाख, ३४ हजार, ८८५ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. म्हणजे प्रत्येकी दहा लाख लोकसंख्येमागे १२,५३३ इतक्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे, असं वेबसाइटे असे म्हटलं आहे.
जागतिक यादीत करोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत तिसर्या क्रमांकावर आहे. अमेरिका ४४ लाख, ४८ हजार, ५०४ कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर ब्राझीलमध्ये २४ लाख ४६ हजार, ३९७ रुग्ण आहेत. यानुसार अमेरिका पहिल्या तर ब्राझील दुसर्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अमेरिकेत १ लाख ५१ हजार ४५० आणि ब्राझीलमध्ये ८७,७३७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मंगळवारी भारतापेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत १५,०९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये केवळ २,९१७ नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील मृत्यूची संख्याही भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे. अमेरिकेत मंगळवारी ३७५ तर ब्राझीलमध्ये ५८ रुग्णांचा मृत्यू झाला.
भारतात दररोज ५ लाखांहून अधिक चाचण्या
देशात सलग दोन दिवसांपासून ५ लाखांहून अधिक करोना चाचण्या घेतल्या जातात. देशात सध्या १,३१० प्रयोगशाळे कार्यरत आहेत. त्यापैकी ९०५ सरकारी आणि ४०५ खासगी लॅब आहेत. देशातील कोविड रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढून ६४.२४ टक्के इतके झाले आहे. त्याचबरोबर, २४ तासांत ३५,१७६ करोना रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विट करून दिलीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I really like and appreciate your blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.