नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. संपूर्ण उत्तर भारताच्या हवामानामध्येही यामुळे मोठ्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दिवसा उन्हामुळे आणि संध्याकाळी थंडीपासून नागरिकांना आता हळूहळू दिलासा मिळत आहे. तर रात्री मात्र तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे.

डोंगर भागांमध्ये थंड वाऱ्यांमुळे तापमानातही चढ-उतार सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप थंडी पूर्णपणे गेलेली नाही. या आठवड्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर पाहायला मिळेल. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकत्र आंघोळ करताना २ सख्ख्या भावांचा दुर्देवी अंत, मामाच्या लग्नाला जायचं होतं, पण घडलं भयंकर
दरम्यान, जळगावमध्ये राज्यातील नीचांकी ७.७ अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली. तर १० अंशाच्या खाली तापमान घसरल्यामुळे नागरिकांना जळगाव ते नागपूरपर्यंत थंडी पाहायला मिळेल. वेस्टन डिस्टन्समुळे हिमालयीन भागामध्ये रविवारपासून पाऊस आणि बर्फवृष्ठी सुरू झाली आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात काही भागांमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. यामुळे याचा परिणाम राज्यातही पाहायला मिळेल. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हलकीशी थंडी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

एका महिलेचा २ पुरूषांसोबत सुरू होता भलताच व्यवसाय; रंगेहात पकडताच पोलिसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here