नवी दिल्ली : लग्नसराईच्या काळात सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजारात सध्या चढ-उताराचे सत्र सुरु असताना गेल्या काही काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले होते. सोन्याच्या दरात जबरदस्त उसळी आली आणि गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरांनी ६० हजार रुपयांचा (१० ग्रॅम) आकडाही गाठला होता. तसेच आगामी काळात मौल्यवान सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या दोन महिन्यांत दहा ग्रॅम सोन्याचा दर सुमारे सात हजार रुपयांनी वाढला असून अर्थसंकल्पामुळे सोन्याच्याच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.सोने-चांदीचे नवीन दर काय?मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) एप्रिल फ्युचर्सचे सोने ५६ हजार ९३४ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत असून सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, एमसीएक्स चांदी मार्च फ्युचर्स २४० रुपयांनी वाढून ६७ हजार ८१६ रुपये प्रति किलोवर ट्रेड होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे तर सोन्या-चांदीच्या दरात वाढीचा कल दिसून येतोय. स्पॉट गोल्ड ११.९० डॉलरने वाढून १,८७७.०३ डॉलर प्रति औंस वर तर स्पॉट चांदीमध्ये प्रति औंस ०.११ डॉलरची वाढ नोंदवली गेली आहे. स्पॉट चांदीच्या किमती $२२.४६ प्रति औंस आहेत.सोन्यातील गुंतवणूकमहागाई आणि मंदीच्या काळात सोन्यातील गुंतवणूक चांगला पर्याय मानला जात असून सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वाशी दिवाळीत सोन्याचा दर ५० ते ५२ हजार रुपयांदरम्यान होता. तर मागील आठड्यात सोन्याने ६० हजारांची विक्रमी पातळी गाठली. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आज नफा होत आहे.एवढेच नाही तर वर्षानुवर्षे सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याने लोकांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळेच आता सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढल्याचे चिंता दिसून येत आहे. लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देऊ लागले असून यामध्ये भारतीयांचे प्रमाण अधिक असल्याचे मानले जात आहे.
Home Maharashtra Gold Price Today: ग्राहकांना दिलासा! विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचे भाव घसरले