वाचा:
पोलिसांनी सध्या या प्रकरणात हत्या झालेला याचा मुलगा व या प्रकरणातील फिर्यादी आकाश काळे यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. संजय काळे याची टेंभुर्णी-अकलूज रोडजवळील उजनी डावा-उजवा कालव्याच्या साइडपट्टीजवळ हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह वाहनासह जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात करमाळाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत हिरे यांनी चौकशी केली असता संजय काळेबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सखोल तपास केला असता या हत्येमागे संजय काळेचा मुलगा आकाश असल्याचे उघड झाले.
वाचा:
आकाश याने त्याचे मित्र लक्ष्मण बंदपट्टे व आलम मुलाणी यांची गुन्ह्यात मदत घेतल्याचे कबुल केले. वडिलांच्या वादग्रस्त चारित्र्यामुळे या बाप-लेकात कायम वादंग होत होते. याच वादातून आकाश याने वडिलांची हत्या करून वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवून जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाचा:
दरम्यान, रविवारी शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला होता. चेहऱ्यावर धारदार शस्राने वार करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या २४ तासांच पोलिसांनी हत्येचे गूढ उकलले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times