लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील बेपत्ता सलून चालक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सलून चालक संदीप यांची त्यांचाच भाचा जॉनीनं गोळी झाडून हत्या केल्याची माहिती पोलीस तपासातून उघड झाली. आरोपीनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. संदीपची पत्नी प्रितीचे जॉनीसोबत अवैध संबंध होते. या संबंधांमध्ये संदीप अडथळा ठरत होता. त्यामुळे जॉनीनं त्याला संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी संदीपची पत्नी प्रिती आणि तिचा प्रियकर जॉनीला अटक केली आहे.

सरुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारा डाहरा गावातील संदीपचं (३२) हेअर कटिंग सलून होतं. २ फेब्रुवारीला तो दुकानात होता. त्यावेळी त्याला मोबाईलवर एक कॉल आला. त्यानंतर तो दुकानातून निघाला. यानंतर तो परतलाच नाही. दोन दिवस संदीपचा शोध न लागल्यानं कुटुंबीय चिंतेत होतं. काहीतरी अघटित घडल्याची शंका त्यांना येऊ लागली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस तपास सुरू झाला.
पत्नीला संपवलं, जमिनीत पुरलं, ३० किलो मीठ टाकलं; वर शेत फुलवलं; कोणालाच शंका नाही, पण…
पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनच्या आधारे संदीपचा भाचा जॉनीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीतून संपूर्ण प्रकरण उलगडलं. पोलिसांनी संदीपची पत्नी प्रिती आणि जॉनीच्या मोबाईल कॉलचे तपशील तपासले. दोघांमध्ये सातत्यानं संवाद होत असल्याचं त्यातून स्पष्ट झालं.

अविवाहित असलेल्या जॉनीचं मामा संदीपच्या घरी येणं जाणं व्हायचं. त्याच दरम्यान त्याचे मामी प्रितीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच संदीपला याबद्दल समजलं. जॉनी आणि प्रितीला संदीप अडथळा वाटू लागला. त्यामुळे त्यांनी संदीपला संपवण्याचा कट आखला.
पप्पा कुठे आहेत? लेकीचा आईला भाबडा प्रश्न; सासूला संशय, बेडखाली पाहिलं तर…
गुरुवारी दुपारी जॉनीनं संदीपला फोन केला. त्याला हायवेवर येण्यास सांगितलं. गोळी झाडून त्याची हत्या करून मृतदेह ऊसाच्या शेतात लपवला. आरोपीनं सांगितलेल्या जागेवर पोलिसांना संदीपचा मृतदेह सापडला. संदीप आणि प्रितीचा विवाह ३ वर्षांपूर्वी झाला. जॉनीचं मामाच्या घरी येणं जाणं असायचं. त्याचवेळी ज़नी आणि प्रिती एकमेकांच्या संपर्कात आले. पुढे त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. या प्रकरणात पोलिसांनी जॉनी आणि प्रिताला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here