नाशिक : अनेक राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविले जात असल्याचं पाहायला मिळतं. कुठे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, तर कुठे अन्नदानासारखे कार्यक्रम आयोजिले जातात. परंतु नाशिक शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी स्पर्धा भरवण्यात येणार आहे. ही स्पर्धा कुठल्या खेळाची नसून ऑटो रिक्षा सजावटीची आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी प्रत्येकाला एक लाख रुपयांचे विमा संरक्षणही मिळणार आहे.

येत्या गुरुवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ५९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य ऑटो रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रिक्षाची आकर्षक सजावट, चालकाचा उत्तम पेहराव याची परीक्षकांकडून पाहणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश घेता येणार असून, फक्त प्रवेशिका भरून द्यायची आहे. या स्पर्धेचे आयोजन शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी केले आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याला 21 हजार, द्वितीय क्रमांकाला 11 हजार, तृतीय क्रमांकाला 7 हजार, चौथ्या क्रमांकाला 5 हजार आणि पाचवे बक्षीस 2 हजार रुपये असणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना मोफत 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आधार आणि पॅनकार्ड आवश्यक असेल. या स्पर्धेत जास्तीत जास्त रिक्षा चालक मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : डोकं आऊट; शिवरायांविषयी आव्हाडांच्या वादग्रस्त विधानानंतर गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

Eknath Shinde Nashik Rickshaw Decoration Competition

दरम्यान ,नाशिक शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या ऑटो रिक्षा सजावट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू झाली असून अनेक रिक्षा चालकांनी देखील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

हेही वाचा : भाजपच्या बालेकिल्ल्यात रासनेंसमोर कडवे आव्हान, कसब्याचा इतिहास धंगेकर बदलणार? वाचा ग्राउंड रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here