रामपूर: रात्रीच्या मिट्ट अंधारात एक नग्न महिला येते, घराची बेल वाजवते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला दिसते. तिला पाहून सगळेच घाबरतात. काळोख्या रात्री घरांच्या बेल वाजवणारी ही महिला नेमकी आहे तरी कोण? ती असं का करते? असे प्रश्न उत्तर प्रदेशच्या रामपूरवासीयांना पडले आहेत. अखेर यावर रामपूर पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध करत महत्त्वाची माहिती दिली आहे.

रात्रीच्या अंधारात दारोदार फिरून बेल वाजवणारी नग्न महिलेची मानसिक स्थिती चांगली नाही. तिच्यावर गेल्या पाच वर्षांपासून उपचार सुरू आहेत, अशी माहिती रामपूर पोलिसांनी दिली आहे. नग्न महिला मध्यरात्री फिरुन दरवाज्यांच्या बेल वाजवत असल्याचे प्रकार सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये कैद झाले. पुढे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामुळे परिसरातील रहिवासी घाबरले. रात्री नग्नावस्थेत फिरणाऱ्या महिलेविरोधात मिलाकच्या ग्रामस्थांनी पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सगळ्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासून पाहिले.
मामा, हायवेजवळ ये! मामीच्या प्रेमात पडलेल्या भाच्याचा कॉल; अनैतिक प्रेमसंबंधांचा भयंकर शेवट
‘रात्रीच्या सुमारास नग्नावस्थेत फिरणाऱ्या महिलेचं रहस्य उलगडलं आहे. या व्हिडीओमध्ये महिलेचे आई, वडील दिसले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी मुलीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचं सांगितलं. तिच्यावर गेल्या ५ वर्षांपासून बरेलीत उपचार सुरू आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलीवर नीट लक्ष ठेवण्याची सूचना रामपूर पोलिसांनी तिच्या पालकांना केली.
पप्पा कुठे आहेत? लेकीचा आईला भाबडा प्रश्न; सासूला संशय, बेडखाली पाहिलं तर…
दिशाभूल करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका, असं आवाहन पोलिसांनी स्थानिकांना केलं आहे. अशा व्हिडीओंमुळे लोकांच्या मनात संभ्रम, भीती निर्माण होते. संबंधित मुलीची बदनामी होते. मुलीच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ती निर्वस्त्र अवस्थेत फिरते. मात्र ती कोणालाही धोका पोहोचवत नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे संवेदनशीलपणे पाहायला हवं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here