नवी दिल्लीः रफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी बुधवारी अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदोरिया हे स्वतः यावेळी उपस्थित राहणार आहेत. ते राफेलच्या पायलटना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. फ्रान्सहून येणारी ५ राफेल विमानं सध्या यूएईच्या हवाई तळावर उपस्थित आहेत. ही विमानं युएईहून बुधवारी सकाळी भारताच्या दिशेने रवाना केली जातील.

राफेल विमानं उतरण्यापूर्वी अंबाला हवाई तळाभोवती कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंबाला हवाई तळाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीलाही बंदी घातली आहे. परिसरातील ४ हून अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मनाई केली गेली आहे.

अंबाला येथे राफेल विमानं येण्याची अपेक्षित वेळ बुधवारी दुपारी २ वाजेची आहे. पण हवामानामुळे त्यात काही बदल होऊ शकतात. हवामानाच्या कुठल्याही बदलाचा सामना करण्यासाठी हवाई दलाने पूर्ण तयारी केली आहे. इतकेच नाही तर विपरित परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी बॅकअप योजनाही हवाई दलाने बनवली आहे.

अंबालामध्ये हवामानामुळे समस्या उद्भवल्यास राफेल विमान अंबाला एअरबेसऐवजी जोधपूर एअरबेसवर उतरवण्यात येईल. यासाठी जोधपूर एअरबेस बॅकअप बेस म्हणून तयार करण्यात आला आहे, असं सांगण्यात येतंय.

अंबाला हवाई तळाच्या सुरक्षेसाठी प्रशासन हाय अलर्टवर

रफेल विमानांच्या लँडिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर आहे. अंबालाला लागून असलेल्या ४ गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना एकत्र येण्या मनाई केली गेली आहे. विमानाच्या लँडिंगच्या वेळी छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी आहे, अशी माहिती अंबाला डीएसपी (वाहतूक) मुनीश सहगल यांनी दिली.

दुसरीकडे, अंबाला हवाई तळ हा राफेल विमान आगमनाच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. अंबाला हवाई तळाच्या परिसरातील ३ किलोमीचटरचा भाग नो ड्रोन झोन घोषित करण्यात आला आहे. याभागात ड्रोन किंवा इतर कोणत्याही उड्डाणांवर पूर्णपणे बंदी असेल.

आरकेएस भदोरिया सर्वोत्तम पायलट पैकी एक

एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया हे भारतीय हवाई दलातील एक उत्तम पायलट आहेत. त्यांनी २६ प्रकारची लढाऊ आणि वाहतूक विमाने उडवली आहेत. यात राफेलचाही समावेश आहे. भदोरिया हे खरेदी पथकाचे अध्यक्ष राहिले आहेत. राफेल राफेल लढाऊ विमान हे जगातील सर्वोत्तम विमान आहे. त्याच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढेल, असं राफेल विमानाच्या उड्डाणाची चाचणी घेतल्यावर हवाई दल प्रमुख भदोरिया म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here