चेन्नई: कायद्याचा अभ्यास करत असलेल्या तरुणानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रेयसीला भेटायला गेलेला तरुण तिच्याशी गच्चीत गप्पा मारत होता. त्यावेळी तिथे तरुणीची आई आली. तिनं दोघांना पाहिलं. त्यामुळे प्रियकर घाबरला. त्यानं गच्चीतून उडी घेतली. त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मरण पावला. तमिळनाडूतील सलेममधील चिन्ना कोलपट्टी परिसरात ही घटना घडली.

दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव संजय आहे. १८ वर्षांचा संजय चेन्ना कोलपट्टीमधील सेंट्रल लॉ कॉलेजात शिकत होता. याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीशी संजयचे प्रेमसंबंध होते. दोघे आधी एकाच शाळेत होते. संजय राहत असलेल्या परिसरातच तरुणी वास्तव्यास होती. तिच्यासोबत तिची आई आणि बहिण राहते.
काळोख्या रात्री नग्न महिला येते, घराची बेल वाजवते; रहिवासी घाबरले, पोलीस म्हणाले, ‘ती’ तर..
शनिवारी सकाळी संजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या इमारतीत गेला. जिना चढून तो गच्चीत पोहोचला. तिथे प्रेयसी त्याला भेटायला आली. त्याचवेळी मुलीची आईदेखील गच्चीत आली. आपण पकडले जाऊ या भीतीनं संजयनं गच्चीतून उडी मारली. त्याचं डोकं जमिनीवर जोरात आदळलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सालेम सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here