नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) चीनशी बऱ्याच कालावधीपासून तणाव सुरू आहे. आता चीनने नवीन दावा केला आहे. वादग्रस्त भागातील बहुतेक ठिकाणांवरून सैनिक मागे हटवल्याचं चीनने म्हटलंय. लडाखमधील पीपी 14, 15 आणि 17 ए मधून चिनी सैनिक पूर्णपणे मागे हटले आहेत, असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीवरून चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिले आहे. चीनने केलेला हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. सीमेवरून चीनने सैनिक हटवलेले नाहीत. चीनचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे, असं भारताने म्हटलं आहे.

पँगाँग सरोवराच्या फिंगर भागातून अद्याप चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या सैन्यात कमांडर स्तरावर लवकरच चर्चा सुरू होणार आहे. चीनने अर्धे काम केलेले आहे आता भारत राहिलेले आर्धे काम पूर्ण करेल आणि दोन्ही देशात एकमत होईल, असं ग्लोबल टाइम्सच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

चीनने बहुतेक सीमावर्ती भागातून आपले सैनिक मागे हटवले आहेत. ‘११ डिसेंबर २०१९ ला रात्रीच्या जेवणाच्या वेळी एक चिनी सैनिक आपल्या भारतीय साथीदारांना जेवताना चायनीज काट्याने (चोपोस्टिक्स) जेवण कसं करायचं ते शिकवतो. ७ डिसेंबर २०१९ ला भारताच्या उमरोई छावणीत चीन-भारतमध्ये आठवा ‘हँड-इन-हैंड २०१९’ हा संयुक्त दहशतवादविरोधी सराव करण्यात आला. प्रत्येक सैन्याने आपल्या १३० सैनिकांचा १६ दिवसांच्या अभ्यासासाठी पाठवले आणि चीनच्या वतीने पीएलएकडून जियांग सैन्य कमांडने भाग घेतला होता, असं ग्लोबल टाईम्समध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीत या वृत्तपत्राने चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा उल्लेख करत म्हटले आहे.

वाटाघाटी नंतर करार

सैन्य आणि मुत्सद्दी चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारानंतर चीनी आणि भारतीय सैन्याने बर्‍याच ठिकाणांहून सैनिक मागे हटवले आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थिती आता शांत आणि सौहार्दपूर्ण होण्याच्या दिशेवर आहे. कमांडर स्तरावरील चर्चेच्या पाचव्या फेरीतील उर्वरित प्रश्न सोडविण्याची तयारी सुरू आहे. कमांडर स्तरावरील चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत आणि सीमा संबंधी चर्चा आणि समन्वयावर ३ बैठका झाल्या आहेत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी मंगळवारी सांगितलं.

भारत आणि चीनच्या सैन्याने गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉईंट १५, हॉट स्प्रिंस या भागांतून सैनिक मागे हटले आहेत. पण पँगॉंग सरोवर आणि फिंगरमध्ये भागामधून चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत, असं वृत्त भारतीय माध्यमांनी दिलं होतं. त्यानंतर वांग यांचे हे स्पष्टीकरण आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here